राशीन ग्रामपंचायतला रखडलेल्या शालेय विविध कामाबाबत जानभरे वस्ती ग्रामस्थांचा उपोषणाचा इशारा.

राशीन( प्रतिनिधी) जावेद काझी.प्रशासक ग्राम विस्तार अधिकारी रूपचंद जगताप व ग्रामविकास अधिकारी कापरे यांना राशिन नजीक जानबरे वस्तीवरील ग्रामस्थांकडून शालेय विविध समस्यांचे निवेदन स्वातंत्र्य दिनाचे अवचित साधत15 ऑगस्ट रोजी देण्यात आले आहे.
यावेळी युवक नेते भीमराव साळवे, सामाजिक कार्यकर्ते उद्धव जानभरे, महेश गोसावी, राष्ट्रवादी अल्पसंख्यांक तालुका अध्यक्ष इमरान शेख, गोविंद जानभरे, वसीम सर, आप्पा देवकाते, मच्छिंद्र जानभरे, सतीश झांबरे, दिगंबर कानगुडे, शालेय विद्यार्थी शिक्षक वृंद आदी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या निवेदनात म्हटले आहे की.वार्ड क्रमांक ४ मधील जानवरे वस्ती येथे जिल्हा परिषद शाळा असून शाळेसाठी शासन स्तरानुसार भौतिक सुविधांची आवश्यकता भासत असताना व त्यासंबंधी परिपत्रक प्राप्त झाले असताना जानभरे वस्तीवरील शाळा अद्याप अनेक सुविधान पासून वंचित दिसत आहे.
रूपे रेन हार्वेस्टिंग, मुला मुलींसाठी स्वतंत्र शौचालय, शौचालयासाठी परसबाग व विविध प्रकारचे वृक्षारोपण, पाण्यासाठी बोरवेल, डिजिटल सुविधा वापरण्यासाठी इन्वर्टर व बॅटरी, शाळेभोवती वॉल कंपाउंड शौचालयाचे काम अपुरे व निकृष्ट दर्जाचे झाले असून अध्याप काम पूर्ण झालेली नाही. वरील दिलेल्या सर्व सुविधा राशीन ग्रामपंचायत स्तरावरून मिळणे आवश्यक असताना अध्यात मिळालेल्या नाहीत त्यामुळे तेथील शालेय मुले व पालक अनेक सुविधेपासून वंचित आहेत. शालेय विद्यार्थ्यांना भौतिक सुविधा मिळाव्यात व भविष्यात अडचण निर्माण होऊ नये अशी पालकांच्या विद्यार्थ्यांची तसेच या विविध समस्यांन बाबत शालेय व्यवस्थापन समिती जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जानवरे वस्ती यांच्याकडून दिनांक २९/७/२४. रोजी राशिन ग्रामपंचायत ला लेखी पत्र दिले असताना देखील अध्याप कामे रखडलेली आहेत. तसेच गेल्या १ एप्रिल 2023. पासून शौचालयाचे काम अध्याप अपुरेच व निष्कृष्ट दर्जाचे आहे. स्लॅब गळत आहे. बांधकामाचे साहित्य शाळेच्या आवारात अस्तव्यस्त पडलेले असून विद्यार्थी व शिक्षक यांच्याकडून ते व्यवस्थित लावण्यात आलेले आहे.भविष्यात काही अनर्थ घडल्यास ग्रामपंचायत जबाबदार राहील असे या निवेदनात म्हटले आहे. वरील दिलेल्या निवेदनाचा तात्काळ विचार करून संबंधित प्रश्न मार्गी लावावेत अन्यथा पुढील आठवड्यात ग्रामपंचायत कार्यालयासमोर अमरण उपोषण करण्यात येईल याची सर्वस्वी जबाबदारी स्थानिक प्रशासनाची असेल असा कडवट इशारा जानभरे वस्ती वरील ग्रामस्थांकडून राशिन ग्रामपंचायत ला देण्यात आला आहे.