राशिन मध्ये काशीविश्वेश्वर रथयात्रा मोठ्या उत्साहात साजरी.

राशीन (प्रतिनिधी):- जावेद काझी.सालाबाद प्रमाणे याही वर्षी श्रावण महिन्याच्या तिसऱ्या बुधवारी काशीविश्वेश्वर भगवान विष्णू रथयात्रा आरती व इतर विधी परंपरा पार पाडीत मोठ्या उत्साहात जल्लोष मय वातावरणात साजरी करण्यात आली. दुपारी १.३० च्या सुमारास काशी विश्वेश्वर मंदिरासमोर रथयात्रेस सुरुवात झाली. नेहमी ठरलेल्या मार्गाने रथयात्रा, फटाक्याची अतिषबाजी करीत यात्रेनिमित्त जमलेले भाविक भक्त, मानकरी, भजनी मंडळी, ढोल ताशा, डीजे च्या तालावर नुर्तकी नाचत गात यात्रेकरूंचा आनंद उत्साह वाढवीत जल्लोषमय वातावरणात काशी विश्वेश्वर विष्णू भगवान रथयात्रा मोठ्या आनंदमय वातावरणात साजरी झाली.
यात्रे दरम्यान कर्जत जामखेड मतदार संघाचे विद्यमान आमदार रोहित पवार व अहमदनगर जिल्हा बँकेचे संचालक माननीय अंबादास उर्फ बप्पाजी पिसाळ यांनी व राशीन पंचक्रोशीतील इतर भाविक भक्तांनी काशीविश्वेश्वर भगवान विष्णू रथयात्रेचे दर्शन घेतले या यात्रेदरम्यान खास आकर्षक म्हणजे महिलांच्या साठी सौंदर्य प्रसाधनाचे वेगवेगळी दुकाने,व बच्चे कंपनीसाठी मिठाईचे दुकान, मौत का कुवा, सापशिडी, पाळणे, व इतर करमणुकीची साधनांचा उपभोग घेत भाविक भक्तांनी, महिला वर्गांनी व बच्चे कंपनीने रथयात्रेचा आनंद उत्सव मोठ्या जल्लोषात साजरा केला. यावेळी मानकरी अमोल शेटे, महेश शेटे, उमेश शेटे, माजी सरपंच शिवदास शेटे व इतर शेटे परिवारांनी यात्रेनिमित्त जमलेल्या सर्व भाविक भक्तांचे आभार मानले.
याच रथयात्रेचे औचित्य साधत सालाबादप्रमाणे कै. शिवाजीराजे राजे भोसले यांच्या स्मरणार्थ राजेभोसले परिवार व मित्र मंडळाच्या वतीने राजे ग्रुप आयोजित भव्य निकाली कुस्त्याचे जंगी मैदान उद्या गुरुवार दिनांक.२२. ऑगस्ट २०२४. रोजी दुपारी ३. वाजता ठिकाण: शिवाजीराजे क्रीडा नगरी पाण्याच्या टाकीजवळ भिगवन रोड राशिन येथील भव्य मैदानात कुस्त्या होणार आहेत तालुक्यातील व राशिन पंचक्रोशीतील कुस्तीप्रेमींनी, इतर नागरिकांनी डोळ्याचे पारणे फेडणारे नेत्र दीपक, कुस्त्या पाहण्याचा आनंद घ्यावा असे आवाहन लोकनेते संभाजी राजे भोसले यांनी केले आहे.