जागतिक महिला दिनानिमित्त दादा पाटील महाविद्यालयात ‘तेजस्विनी महोत्सव’ अंतर्गत महिला सन्मान दिन साजरा
महिलांशिवाय कुटुंबाला आकार मिळत नाही - राजेंद्र तात्या फाळके

कर्जत (प्रतिनिधी) :- जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून रयत शिक्षण संस्थेच्या दादा पाटील महाविद्यालयामध्ये दिनांक ०८ मार्च ते १० मार्च २०२३ या काळात ‘महिला विकास मंच’ अंतर्गत ‘तेजस्विनी महोत्सवाचे’ आयोजन करण्यात आले होते. यानिमित्त आज बुधवार दि. ८ मार्च रोजी महाविद्यालयातील प्राध्यापिका तसेच कर्जत तालुक्यात सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, राजकीय, धार्मिक आदि क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या महिलांच्या सन्मानाचे आयोजन करण्यात आले होते.
तेजस्विनी सन्मान सोहळ्यात कर्तृत्ववान महिलांचा सन्मान महाविद्यालयात करण्यात आला. यामध्ये कर्जत नगरपंचायतच्या नगराध्यक्षा सौ. उषाताई राऊत, सौ.अश्विनीताई कानगुडे, सौ. पूजा सूर्यवंशी, सौ. प्रतिभाताई भैलुमे, सौ. जयश्री मुळे, आशा म्हेत्रे, मनीषा जाधव, उज्वला कवडे, ज्योती शेळके, सुवर्णा सुपेकर, अश्विनीमाई दळवी, मोनाली तोटे, मोहिनी पिसाळ, लंकाताई खरात, छाया शेलार, प्रतिभा नंदकिशोर भैलुमे, ताराबाई कुलथे, प्रियंका तोरडमल, स्वाती पाटील, जयश्रीताई मेंढे, सौ.शेळके डॉक्टर आदि कर्जत तालुक्यातील विविध क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांचा आजच्या महिला दिनानिमित्त महाविद्यालयाकडून सन्मान करण्यात आला. तसेच महाविद्यालयातील सर्व महिला प्राध्यापिका यांचाही सन्मान मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.
याप्रसंगी आदर्श माता म्हणून सौ. कुसुमताई प्रकाश धांडे, सौ. सिंधुताई जमदाडे, सौ. माधुरी उमेश जेवरे, सौ लक्ष्मी राजेंद्र धांडे यांचाही सन्मान करण्यात आला.
पहिल्या सत्रात आयोजित केलेल्या सत्कार सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून पंचायत समिती कर्जतच्या गटशिक्षणाधिकारी मा. मीना शिवगुंडे उपस्थित होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रयत शिक्षण संस्थेच्या मॅनेजिंग कौन्सिलचे सदस्य मा.राजेंद्र तात्या फाळके तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय नगरकर व बहुसंख्येने महाविद्यायातील विद्यार्थिनी उपस्थित होत्या.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत दादा पाटील महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय नगरकर यांनी केले. १९७५ नंतरच जागतिक महिला दिन मोठ्या प्रमाणामध्ये सुरू झाल्याचे नमूद केले. कर्तृत्ववान महिलांचा सन्मान व्हावा या उद्देशाने तेजस्विनी सन्मान सोहळ्याचे आयोजन केल्याचे यावेळी त्यांनी सांगितले. प्रमुख पाहुण्या माननीय मीना शिवगुंडे यांनी नमूद केले की, लहानपणी पिता, लग्न झाल्यावर नवरा व वार्धक्यकाळात पुत्र महिलांचे रक्षण करीत आला आहे. आपले कार्य व कर्तृत्व महिलांनी सिद्ध करीत राहावे. अन्याय झाल्यावर महिलांनी वाचाही फोडली पाहिजे. घरोघरी कुटुंबामध्ये संवाद झाला पाहिजे. महिला दिन साजरा करण्याची वेळच येऊ नये असा सन्मान समाजामध्ये महिलांचा व्हायला हवा.
कार्यक्रमाचे अध्यक्ष राजेंद्र तात्या फाळके यांनी आपल्या मनोगतात म्हटले, जिच्या उदरातून आपण जन्म घेतो त्या मातेला, महिलेला स्वातंत्र्य नसते ही परिस्थिती भयानक असल्याचे सांगितले. महिलांवरती जो अन्याय होतो आहे यासंदर्भात विचार मंथन झालेे पाहिजे. लग्न झाल्यावर कुटुंब सोडून पतीला सर्वस्व मानणारी ही महिला असते. एका महिलेने दुसऱ्या महिलेला महत्त्व दिले गेले पाहिजे. महिलेशिवाय कुटुंबाला आकार मिळत नाही. दुर्दैवानं पतीचे निधन झाले तर महिला निर्धाराने जगते. परंतु पत्नीचे निधन झाले की पुरुषांचे हाल होतात आणि मग त्याला पत्नीचे महत्त्व समजू लागते. एक महिला शिकते तेव्हा ती संपूर्ण कुटुंबाला शिकवत असते हे महात्मा फुलेंनी ओळखले होते, म्हणूनच आज ज्या क्षेत्रात पुरुषांचे वर्चस्व आहे त्या क्षेत्रामध्ये महिलांनी प्रवेश करून आपले कर्तृत्व सिद्ध केले आहे. रयत शिक्षण संस्थेची स्थापना देखील लक्ष्मीबाई पाटील या महिलेच्या अश्रूमुळे झालेली आहे. लक्ष्मीबाईंनी कर्मवीरांना खंबीर साथ दिली.
तेजस्विनी सन्मान सोहळ्यातील सत्काराला उत्तर म्हणून कर्जत नगरपंचायतच्या नगराध्यक्ष सौ. उषाताई राऊत तसेच सौ. अश्विनीताई कानगुडे यांनी आपली मनोगते व्यक्त केली.
कार्यक्रमाच्या दुसऱ्या सत्रात ‘बाईपणाच्या कविता’ या विषयावरील कवयित्री संमेलनामध्ये २७ विद्यार्थिनींनी कविता सादर केल्या. या कवयित्री संमेलनाच्या अध्यक्षा ‘भूमिकन्या पुरस्कार’ प्राप्त कवयित्री स्वाती पाटील या होत्या. या कवयित्री संमेलनामध्ये साक्षी गांगर्डे, वैष्णवी गदादे, अल्फीया शेख, प्रिया गायकवाड, वैष्णवी गायकवाड, त्रिवेणी वाघमारे, सीमा रोडे, हर्षदा नरसाळे, आरती करडे, अंबिका जगताप, साक्षी वाघ, ज्ञानेश्वरी डवले, पल्लवी खांडेकर, मयुरी गंडगिरे, निकिता पवार, स्नेहल वाघ, प्रीती शिंदे, ज्योती फरताडे, अंजली तरटे, सृष्टी घेममरुड, वैष्णवी अभंग, चंद्रभागा सोनटक्के, रिंकू साळुंखे, प्रगती आढाव, राजर्षी शिंदे व या विद्यार्थिनींनी व डॉ. बेबी खिलारे यांनी कविता सादर केल्या.
हा महोत्सव यशस्वी करण्यासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय नगरकर, महिला विकास मंचाच्या चेअरमन डॉ. माधुरी गुळवे, क्रीडा संचालक डॉ. संतोष भुजबळ, सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ. प्रमोद परदेशी, एन.एस.एस कार्यक्रमाधिकारी डॉ. कैलास रोडगे, एन.सी.सी कमांडिंग ऑफिसर डॉ. संजय चौधरी, क्रीडा शिक्षक प्रा. शिवाजी धांडे व महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. स्वप्निल मस्के यांनी केले. तर आभार उपप्राचार्य डॉ. प्रमोद परदेशी यांनी मांनले.