श्री धाकोजी महाराज माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांना सायकलींचे वाटप

समृध्द कर्जत (प्रतिनिधी) :- महाराष्ट्राचे युवा नेतृत्व आमदार रोहित दादा पवार साहेब यांच्या माध्यमातून कर्जत जामखेड येथील विद्यार्थ्यांना 14000 सायकलींचे वाटप करण्यात आले आहे.
निमगाव डाकू येथील श्री धाकोजी महाराज माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांना मागील वर्षी 40 तर आमदार रोहित पवार यांच्या वतीने 80 सायकली देण्यात आल्या.
या सायकल वाटपाचा कार्यक्रम १२/०८/२०२४ रोजी श्री धाकोजी महाराज माध्यमिक शाळेत आयोजित करण्यात आला होता.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचे कर्जत शहर अध्यक्ष प्रा.श्री.विशाल मेहेत्रे, व नगरसेवक श्री.सुनील दादा शेलार, यांनी आपले मनोगत व्यक्त केले
या वेळी संघटनेचे अध्यक्ष तथा नगरसेवक श्री.प्रसादशेठ ढोकरीकर, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचे कर्जत शहर अध्यक्ष प्रा.श्री.विशाल मेहेत्रे, नगरसेवक श्री.सुनील दादा शेलार, नगरसेवक श्री.लालासाहेब शेळके, नगरसेवक व पाणीपुरवठा सभापती श्री.भाऊसाहेब तोरडमल, डॉ. नगरसेवक श्री भास्करजी भैलुमे, नगरसेवक श्री देविदास आबा खरात, नगरसेवक श्री रविंद्र सुपेकर, सोशल मीडिया प्रमुख मंगेश शिंदे, निमगाव डाकूचे सरपंच श्री. बापूसाहेब आजबे, माजी सरपंच श्री. शंकर शेंडकर, श्री.राजेंद्र राजेभोसले, उपसरपंच श्री. रवींद्र कोठावळे, ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी विद्यार्थी शिक्षक ग्रामस्थ व सरपंच यांनी माननीय आमदार रोहित दादा पवार साहेब यांचे आभार मानले.