ब्रेकिंग
मिसाईल मॅन राष्ट्रपती ए.पी.जे. अब्दुल कलाम यांना राशीन मध्ये विनम्र अभिवादन.

Samrudhakarjat
4
0
1
8
4
8
राशीन(प्रतिनिधी):- जावेद काझी .मा. राष्ट्रपती तसेच मिसाईल मॅन म्हणून आपली ओळख जगभरात असलेले एपीजे अब्दुल कलाम यांच्या स्मृतिदिनानिमित्त कर्जत तालुका दूध संघाचे अध्यक्ष/मा.उपसरपंच शंकर देशमुख व भाजपा अल्पसंख्यांक आघाडीचे प्रदेश सचिव सोयब काझी यांच्या हस्ते मरहुम कलाम यांच्या प्रतिमेचे पूजन करून विनम्र अभिवादन करण्यात आले.
राशीन ग्रामपंचायतीच्या सभागृहात झालेल्या या कार्यक्रमास रिपाई पक्षाचे अतुल साळवे, मोहसीन काझी, चालक-मालक संघटना तालुकाध्यक्ष जाकिर काझी, भाजपा अल्पसंख्यांक राशीन शहराध्यक्ष जमीर काझी, शकील कुरेशी, निहाल काझी, राजू तांबोळी, रोशन मुंडे, शाकीर शेख, विनोद आढाव, आदि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.