गरीबाच्या घरासमोर दिवाळीच्या मुहूर्तावर रांगोळी ऐवजी दुर्गंधीयुक्त दूषित पाण्याचा पूर! .

राशीन( प्रतिनिधी) जावेद काझी. :- राशीन मधील मातंग वस्ती परिसरात अत्यंत आर्थिक रित्या गरीब परिस्थितीवर मात करीत असलेल्या सदानंद उकिरडे यांच्या राहत्या घरापुढे राशीन ग्रामपंचायतीच्या प्रशासकीय गलथान कारभारामुळे ऐन दिवाळीच्या सणासुदीच्या मुहूर्तावर राहत्या घराच्या अंगणात दुर्गंधीयुक्त दूषित गटारीच्या पाण्याला नाल्याचे स्वरूप आले असून घरात जाण्यायेण्यासाठी दुर्गंधीयुक्त दूषित पाण्यातून वाट काढावी लागत आहे. अनेक वेळा ग्रामपंचायत प्रशासकीय अधिकारी कर्मचारी यांना सांगून देखील या दुर्गंधीयुक्त दूषित पाण्याचा प्रश्न स्थानिक प्रशासनाकडून मार्गी लागलेला नाही. सदानंद उकिरडे यांच्या मते घरासमोरील गटार चेंबर मधील पुढील मार्गस्थ पाईप कमी जाडीचा असल्यामुळे पाण्याचा निचरा व्यवस्थित होत नसल्यामुळे पाणी पुढे जात नाही त्यामुळे पाणी चोकअप होऊन घराच्या अंगणात जमते. त्यामुळें दीपावलीच्या मुहूर्तावर उकिरडे यांच्या
अंगणात रांगोळी, फटाके ऐवजी दुर्गंधीयुक्त दूषित पाण्याचे तांडव पाहावयास मिळत आहे. अशा गरीब कुटुंबाच्या सदस्यावर सनासुदीच्या मुहूर्तावर अशी वेळ येणे योग्य आहे का? याचा विचार स्थानिक प्रशासनाने करावा व दूषित साचलेल्या पाण्याचा प्रश्न मार्गी लावावा अशी मागणी सदानंद उकिरडे परिवाराकडून व त्या परिसरात राहणाऱ्या नागरिकांकडून होत आहे.