सुहास घोडके यांची पोलीस निरीक्षक पदी पदोन्नती झाल्याबद्दल राशीन मध्ये जंगी सत्कार.

राशीन (प्रतिनिधी):- जावेद काझी .राशीन चे सुपूर्त सुहास रामदास घोडके यांची लकडगंज पोलीस स्टेशन नागपूर येथे पोलीस निरीक्षक पदी पदोन्नती झाल्याबद्दल राशिन मधील १९९५ च्या एस.एस.सी (१० वी) बॅचच्या शालेय विद्यार्थी ग्रुपच्या वतीने रानवारा हॉटेल राशीन येथे पोलीस निरीक्षक सुहास घोडके यांचा जंगी स्वागत व सत्कार करण्यात आला. यावेळी युवक
नेते शहाजीराजे राजे राजे भोसले, सुनील मंडलिक, हनुमंत येवले, शहाजी जाधव, समीर दोशी , रियाज बागवान, गणेश धनवडे, कलीम पठाण, राम काळे, दादा काळे, पांडुरंग टिळेकर, धनंजय जगताप, दत्ता आढाव, अब्दुल शेख, बंडू टाक, सचिन शिंदे व इतर मित्र परिवार मोठ्या संख्येने उपस्थित होता.
यापूर्वी सुहास घोडके हे सहाय्यक पोलीस निरीक्षक पदी नागपूर शहर येथे कार्यरत होते. मध्यमवर्गीय कुटुंब व आई-वडील पेशाने शिक्षक असलेल्या परिवारात सुहास घोडके यांचा जन्म झाला. संघर्ष, परिश्रम, जिद्द, चिकाटी ,असा खडतर प्रवास करीत पोलीस निरीक्षक पदी पदोन्नती प्राप्त झाल्याबद्दल राशीन व परिसरात अभिनंदन होत असून कौतुकाचा वर्षाव होत आहे. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुनील मंडलिक यांनी केले तर आभार हनुमंत येवले यांनी मानले.