माझी वसुंधरा पथनाट्य स्पर्धेत दादा पाटील महाविद्यालयाच्या कलाकारांनी कर्जत शहरातील विविध ठिकाणी जनजागृतीपर पथनाट्य सादर केले.

कर्जत (प्रतिनिधी) :- ‘प्लास्टीक मुक्त वसुंधरा’ व ‘माझी वसुंधरा सुंदर वसुंधरा’ हे दोन वैचारिक विषय घेऊन सांस्कृतिक विभागातील दोन संघातील कलाकारांनी पथनाटय सादर केली. वसुंधरेची अपरिमित हानी,प्लास्टिकच्या अतिवापरामुळे होणारे तोटे,वृक्षतोड,जलप्रदूषण,वायु प्रदूषण,ध्वनी प्रदूषण आणि या सर्व समस्यांवर असणारे उपाय विविध प्रसंगांच्या माध्यमातून दाखवण्यात आले.
गणेश पवार,प्रकाश शिंदे,श्रीमंत दळवी,ऋषिकेश मथे,अंजली अडसुळ, प्रियंका सस्ते, पुजा तळेकर, अर्पिता राऊत,प्रियंका गदादे,अमृता पवार, श्वेता काकडे,साक्षी गांगर्डे,आशिता काळे,कल्याणी कोकाटे, पुजा कटारे या कलाकार विद्यार्थ्यांनी आपल्या खुमासदार शैलीत प्रबोधनपर पथनाट्ये सादर केली.
पथनाट्याचे संघव्यवस्थापक व मार्गदर्शक म्हणून प्रा.स्वप्नील म्हस्के (सदस्य,सांस्कृतिक विभाग ) यांनी काम पाहिले.
पथनाट्यासाठी दादा पाटील महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय नगरकर,सांस्कृतिक विभाग प्रमुख व कला विभाग उपप्राचार्य प्रा.डॉ प्रमोद परदेशी व सर्व रयतसेवकांचे सहकार्य लाभले.
पथनाट्यप्रसंगी मा.नगराध्यक्षा ,मा.उपनगराध्यक्षा, सभापती, उपसभापती, गटनेते, उपगटनेते ,नगरसेवक ,नगरसेविका, नगरपंचायतीचे सर्व अधिकारी,प्राध्यापक व कर्मचारी, व्यापारी बंधू व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.