चार वर्षापासून कुकडी कॅनल संपादन मोबदल्यापासून -आदिवासी महिला वंचित

कर्जत (प्रतिनिधी) :- मौजे देशमुखवाडी येथील गट नंबर ४२६ मधून मात्री अशोक काळे यांचे १ हेक्टर १६ आर क्षेत्र असून सदर क्षेत्रामधून कुकडी कॅनल गेलेला आहे .सदर कुकडी कॅनॉल मध्ये ४ गुंठे क्षेत्र गेलेले आहे. या संपदानाचा मोबदला मिळण्यासाठी गेल्या ४ वर्षापासून मात्री अशोक काळे यांनी तलाठी कार्यालय भुमि -अभिलेख व भूसंपादन अधिकारी व कुकडी विभाग यांच्या कडे सतत फेरे मारत आहे. तसेच भूसंपादन चा मोबदला मिळण्यासाठी कित्येक आंदोलन, मोर्चे व उपोषण केलेले आहे. परंतु सतत आश्वासन देण्यात येत आहे. आता आश्वासन नको तर प्रत्यक्ष कारवाई करण्यात यावी. नाहीतर आम्हाला मोबदला मिळाला नाही, तर आमच्या रानातून कुकडी कॅनॉल गेलेला तो बंद पाडणार आहे. तसेच तरीही तलाठी, भूसंपादन अधिकारी व भूमी अभिलेख यांच्या संगनमताने ४ गुंठे क्षेत्राचा मोबदला अद्यापर्यंत मिळू शकलेला नाही. तसेच त्या क्षेत्रातून २१ गुंठे जमीन कुकडी कॅनॉलच्या लगत जाणाऱ्या रस्त्यासाठी संपादित झालेले आहे. तरी सदरील ४ गुंठे व २१ गुंठे असे एकूण २५ गुंठे क्षेत्र कुकडी कॅनल व रस्त्यासाठी संपादित झालेले आहे. तरी अद्याप पर्यंत श्री मात्री अशोक काळे यांना संपादित क्षेत्राचा मोबदला दिनांक ९ /११/२०२३ पर्यंत न मिळाल्यास पारधी विकास कृती समितीच्या वतीने १०/११/२०२३ ला वरील संपादित क्षेत्रातून गेलेला कॅनल व रस्ता जेसीबीच्या साह्याने बुजवण्यात येईल याची दखल प्रशासनाने घेण्यात यावी.