
कर्जत प्रतिनिधी : – कर्जत तालुक्यातील हजारो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या ग्रामदैवत संत सद्गुरु गोदड महाराज यांच्या संजीवन समाधी मंदिरातील समाधीस्थळी असलेल्या मेघडंबरीला बावीस किलो चांदीचे नक्षिकाम करण्यात येणार आहे.
आमदार रोहित पवार यांच्या संकल्पनेतून करण्यात येणाऱ्या या कामाची सुरुवात विधिवत पद्धतीने पूजन करून करण्यात आली आहे. बारामती अग्रोचे अध्यक्ष राजेंद्र पवार यांच्या तसेच कर्जत नगरपंचायतचे नगराध्यक्ष उपनगराध्यक्ष गटनेते उपघटनेते सर्व समिती सभापती नगरसेवक नगरसेविका यांच्या हस्ते हे पूजन करण्यात आले.
यावेळी संत गोदड महाराज मंदिरातील मानकरी, पुजारी, सेवेकरी, यात्रा कमिटी, शहरातील सर्व पत्रकार बांधव, हरिनाम सप्ताह समिती व भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. विविध धार्मिक कार्यक्रमांनी या नक्षीकामाची सुरुवात करण्यात आली आहे. दिनांक १३ व १४ रोजी येथील संत गोदड महाराज रथ यात्रोत्सव संपन्न होत असून भाविकांकडून जय्यत तयारी सुरु आहे.