कर्जतमध्ये खा डॉ सुजय विखें यांच्या हस्ते केले महिलांना कर्ज वाटप

समृध्द कर्जत/प्रतिनिधी :- खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांच्या हस्ते साहित्याचे वितरण करण्यात आले. कर्जत येथे अहिल्यादेवी लोकसंचित केंद्र, उमेद व कर्जत तालुका अभियान व्यवस्थापन कक्ष तथा ग्रामीण स्वयंरोजगार निर्मिती अंतर्गत यावेळी स्वयंरोजगार विक्री केंद्र, फूड प्रोसेसिंग युनिट, औजारे बँक व बचत गटातील महिलांना बँक कर्ज वाटप करण्यात आले.
भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाच्या संयुक्त विद्यमाने कर्जत मंडल येथे आयोजित नारी शक्ती वंदन या कार्यक्रमाअंतर्गत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दुरदृष्य प्रणालीद्वारे महिलांना मार्गदर्शन केले. खा. डॉ. सुजय विखे पाटील यांच्यासह महिलांनी हा कार्यक्रम ऐकला. यावेळी पंतप्रधान महोदयांनी महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनविण्यासाठी केलेले विविध प्रयत्न आणि महिला हिताच्या विविध योजनांबाबत माहिती दिली.
याप्रसंगी भाजपा महिला जिल्हाध्यक्ष अश्विनीताई थोरात, प्रतिभा रेणुकर, शबनम इनामदार, शामल थोरात, नीता कचरे, शेखर खरमरे, सुनील यादव, अनिल गदादे, शहाजीराजे भोसले, विक्रम भोसले, संजय तापकीर, विनोद दळवी यांच्यासह भाजपा व महायुतीचे सर्व पदाधिकारी, ग्रामस्थ, अधिकारी व बचत गटातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.