pub-1628281367759110 google.com, pub-1628281367759110, DIRECT, f08c47fec0942fa0
Advertisement
आरोग्य व शिक्षणब्रेकिंग

बौद्ध संस्कार संघ (अहिल्या नगर) आयोजित वधू-वर परिणय सुचक मेळावा यशस्वी

Samrudhakarjat
4 6 5 9 6 5

आज दिनांक 15/6/2025 रविवार रोजी कर्जत येथे बौद्ध धर्मीय आयोजित केलेला वधू-वर मंगल सुचक परिणय मेळावा उत्तम व काटेकोर नियोजना पार पडला गेले 23 वर्षा पासून सामाजिक उपक्रम म्हणून बौद्ध संस्कार संघा द्वारे बौद्ध धर्मीय वधू वर परिणय सुचक मेळाव्याचे आयोजन अहिल्या नगरचे मा• भाऊसाहेब देठे करत आहेत याच उपक्रमाचा एक भाग म्हणून कर्जत ता• कर्जत जिल्हा अहिल्यानगर येथे शिवपार्वती मंगल कार्यालयात बौद्ध धर्मीय वधू वर मेळावा यशस्वी पणे पार पडला या मेळाव्यास अपेक्षे पेक्षा जास्तीचा प्रतिसाद मिळाला या मेळाव्या साठी उपस्थित असलेले वधू- वरांच्या पालकास अपेक्षा नुसार इच्छुक वधू-वरा बाबतची अपेक्षित माहिती प्राप्त झाली.

कर्जत येथे प्रथमच या पद्धतीच्या सामाजिक उपक्रमाचे आयोजन केले होते या वेळी एकूण 16 वधू तर 14 वर पालक आज प्रत्यक्षात नोंदणी साठी उपस्थित होते तर ऑनलाइन पद्धतीने 130 वधू,128 वर यांची नोंदणी झालेली आहे  आज च्या या कार्यक्रमा साठी कर्जत पंचायत समितीचे गट शिक्षण अधिकारी सौ• उज्वला गायकवाड, कर्जत पंचायत समितीची कक्ष अधिकारी मा•दीपक समुद्र, मा• दीपक घोडेराव पंचायत समिती जामखेड,सेवानिवृत्त लेखा अधिकारी, सौ•वैशाली राजगुरू- कांबळे, लेखा आधिकारी,पंचायत समिती कर्जत, वयोवृद्ध ज्येष्ठ नागरिक, सेवानिवृत्त भागा अधिकारी मा• भा•को•साळवे, सेवानिवृत्त

प्रा• अनंत सोनवणे, कर्जत तालुका मार्केट कमिटीचे संचालक मा• वसंत कांबळे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते… कर्जत तालुक्यात प्रथमच या मेळाव्याचे आयोजन केले होते या कारणाने उपस्थितीचे प्रमाण जरा कमी होते पण जी उपस्थिती ती उपस्थिती गरजवंत मंडळीची होती कारण आज सकाळी 10 ते संध्याकाळी 5:00 वाजे पर्यंत उपस्थिती कायम होती…या वेळी मंगल परिणय इच्छुक उमेदवारांच्या उपस्थितत त्यांच्या पालकांच्या प्रत्यक्षात एकामेकां समोर गाठी-भेटी तर बाकीच्या बऱ्याच मंडळीला समाधान कारक, मिळते-जुळते अपेक्षा नुसार स्थळांची माहिती व

पालकांचा संपर्क नंबर सह वधू-वरांच्या पालकांची वैयक्तिक माहिती संबंधितांना प्राप्त झाली या वेळी प्रमुख पाहुण्या सह, या मेळाव्यास उपस्थित वधू-वरांच्या पालकांचे स्वागत करण्यात आले या वेळी नाशिक, छत्रपती संभाजी नगर, बीड, पुणे, अ•नगर सह कर्जत तालुक्यातून उत्तम प्रतिसाद मिळाला एकंदरीत आजचा कार्यक्रम अपेक्षा ही जास्त यशस्वी झाला या कार्यक्रमाचे मूळ संकल्पक व या मेळाव्याचे मुख्य आयोजक मा• भाऊसाहेब देठे यांनी या कार्यक्रमाची प्रस्तावना, रूपरेषा आपल्या मनोगता द्वारे व्यक्त केली तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मा• जालिंदर सोनवणे सर यांनी केले तर मा• विक्रम कांबळे सर यांनी अशा उपक्रमाची तालुक्यात आवश्यकता असून सामाजिक बांधिलकी या भावनेतून या उपक्रमा कडे पाहीले जाईल असे मनोगत व्यक्त करत या उपक्रमाचे कौतुक केले…

तर या कार्यक्रमाचे अध्यक्ष कर्जत तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी सौ• उज्वला गायकवाड यांनी आशा सामाजिक उपक्रमा साठी मी सर्वतोपरी मदत करेल अशी भावना व्यक्त केली  हा नियोजित कार्यक्रम यशस्वी करण्या साठी मा• करण ओहळ, मा•सुरज कदम, मा•प्रमोद भैलूमे सर, मा•सोमनाथ भैलूमे,सौ• देठे मॅडम, मा•विक्रम कांबळे, मा•जालिंदर सोनवणे, मा•सुरेश सरोदे,अक्षय समुद्र,धनंजय भैलूमे तसेच परिवर्तन ग्रामीण वाचनालयाचे अध्यक्ष मा•पनाजी कदम, तसेच स्वयंसहाय्यता युवा केंद्र ( कर्जत) या ग्रुपने विशेष सहकार्य केले, परिश्रम घेतले…

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे
pub-1628281367759110 google.com, pub-1628281367759110, DIRECT, f08c47fec0942fa0

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker