बारामती अमरापुर राज्य मार्गावर राशीन गावात विविध ठिकाणी स्पीड ब्रेकर बसणार: पै. शाम कानगुडे.

राशीन(प्रतिनिधी) जावेद काझी. :- बारामती अमरापुर राज्यमार्गा च्या रस्त्याचे काम पूर्ण झाले असून या मार्गावर वाहतुकीचे प्रमाण देखील वाढले असल्यामुळे सुसाट वेगामुळे अपघाताचे प्रमाण नजीकच्या काळात वाढले असून मा. सभापती पै. श्याम भाऊ कानगुडे यांनी वेळोवेळी सार्वजनिक बांधकाम विभाग अधिकारी व कॉन्ट्रॅक्टर यांच्याशी चर्चा व पाठपुराकडून कर्जत तालुक्यातील खेड ते कर्जत येथील रस्त्यावरील स्पीड ब्रेकर बनविण्यात आले आहे. यामुळे अपघात होण्याच्या प्रमाणाला थोडासा दिलासा मिळाला आहे. परंतु राशीन गावातील जंजिरे पेट्रोल पंप ते अशोका हॉटेल पर्यंतच्या वाहतूक कोंडीच्या मुख्य भागात व रस्त्याच्या क्रॉसिंग वर जसे युनियन बँक, दोशी पेट्रोल पंप, मातंग वस्ती, महात्मा ज्योतिबा फुले चौक, जगदंबा विद्यालय, एसटी स्टँड, डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रवेशद्वार या प्रमुख वरदळीच्या ठिकाणी स्पीड ब्रेकर बसणे तसेच त्या ब्रेकर वर पांढरा कलर देणे आवश्यक आहे.
अशी मागणी श्याम कानगुडे यांनी सार्वजनिक बांधकाम विभाग अधिकारी व कॉन्ट्रॅक्टर कोठारी यांच्याशी केली असता येत्या आठ दिवसात स्पीड ब्रेकर चे काम पूर्ण करू असे तोंडी आश्वासन मिळाले असून रस्त्याच्या साईटचा कचरा काढण्याचे काम सुरू झाले असून लवकरच योग्य त्या ठिकाणी स्पीड ब्रेकर बसवले जातील असे आश्वासन कोठारी यांनी दिले आहे. असे श्याम कानगुडे यांनी सांगितले.