भारतीय जनता पार्टी राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांच्या संकल्पनेतून “गाव चलो अभियान

कर्जत (प्रतिनिधी) : भारतीय जनता पार्टी राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांच्या संकल्पनेतून “गाव चलो अभियान ” दि . ४ ते ११ फेब्रवारी पर्यत राबविण्यात येत आहे . प्रत्येक बूथ पर्यत भाजप कार्यकर्त्यांने मुक्कामी राहत प्रवास करावयाचा आहे . केंद्र सरकारच्या दहा वर्षे च्या कामगिरीच्या अनुषंगाने प्रत्येक गावामध्ये भाजप कार्यकर्त्यांनी कमीत कमी ३ बूथची जबाबदारी घेऊन प्रवास करायचा आहे . २४ तास त्या ठिकाणी प्रवास करावयाचा आहे . बूथ निहाय रचना, लाभार्थ्यांची भेट, महिला सबलीकरण, वैद्यकीय सुविधा, शेतकरी सन्मान योजना, अंत्योदय अशा विविध योजनांचा आढावा घेणे, विविध योजनेच्या लाभार्थींची भेट घेणे, सरकारी कर्मचारी, आशा सेविका, अंगणवाडी या सर्व कर्मचार्यांची भेट घेणे . नमो अँप डाऊनलोड करणे, नमो चषक खेळांडूची नोंदणी करणे अशा विविध १८ उदिष्टावर काम करायचे आहे .
तळागाळातील प्रत्येक मतदारापर्यंत मोदी सरकारचे गेल्या दहा वर्षांतील प्रभावी कार्य, मागच्या जाहीरनाम्यातील आश्वासनांची केलेली पूर्ती, विकसित भारताचा संकल्प सांगणाऱ्या यंदाच्या अंतरिम अर्थसंकल्पातील ठळक तरतुदी ही सर्व माहिती पोहोचवण्याच्या उद्देशाने हे अभियान हाती घेण्यात आले आहे.
याच पार्श्वभूमीवर कर्जत तालुक्यात भाजपचे आमदार प्रा राम शिंदे यांच्या गाव चलो अभियान दौऱ्याचे आयोजन केले होते, त्यांनी कर्जत जामखेड मतदार संघातील कर्जत तालुक्यातील निमगाव गांगर्डा येथील बूथ क्र १, २, ३ या बूथ मध्ये प्रवास केला . मोदींची गॅरंटी काय आहे हे प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचवण्यासाठी मोदी सरकारच्या योजना व उल्लेखनीय कामगिरीची माहिती प्रत्येक नागरिकांपर्यंत पोहोचवणे हे या अभियानाचे उद्दिष्ट असल्याची माहिती आ प्रा राम शिंदे यांनी यावेळी दिली. आ . राम शिंदे यांच्या गाव चलो अभियानाला कर्जत तालुक्यात नागरिकांचा उस्फुर्त प्रतिसाद मिळत आहे.
दरम्यान आ शिंदे यांनी तालुक्यातील निमगाव गांगर्डा गावचा प्रवास करत गावात मुक्काम केला, यावेळी त्यांनी गावातील वाड्यावस्त्यावर जाऊन ग्रामस्थांशी संवाद साधला तसेच ग्रामस्थांसोबत एकत्रितपणे स्नेहभोजन केले, गावातील ग्रामस्थांशी संवाद साधत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लोकोपयोगी योजनांची माहिती त्यांना दिली.
गावातील महिला बचत गटाच्या महिलांनी आ शिंदे यांच्याशी संवाद साधला. पंतप्रधान नरेंद्र मोदीच्या नेतृत्वात महिला सक्षमीकरणासाठी राबविण्यात येणाऱ्या योजनांची माहिती आ शिंदे यांनी महिलांना दिली. तसेच, प्रधानमंत्री आवास योजना आणि पीएम किसान सन्मान योजनेच्या लाभार्थ्यांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. अनुसूचित जातीचे घरकुल योजनेचे लाभार्थी यांची भेट घेतली . विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी यांची भेट घेतली . मनसेचे कर्जत तालुकाध्यक्ष श्री सचिन सटाले यांची सदिच्छा भेट घेतली .
स्थानिक स्वराज्य संस्थांचे प्रतिनिधी, सहकारी संस्थांचे प्रतिनिधि, विविध सामाजिक संघटनेचे पदाधिकारी यांच्या भेटी घेऊन संवाद करत योजनांची माहिती दिली . दिवार लेखन उपक्रमा अंतर्गत बार बार मोदी सरकार असे भित्ती लेखन करत कार्यक्रमाचा समारोप केला . या संपूर्ण प्रवासामध्ये त्यांच्या समवेत गटातील बूथ प्रमुख, शक्तिकेंद्र प्रमुख, बूथ वॉरिअर तालुकाध्यक्ष श्री शेखर खरमरे आवर्जून उपस्थित होते . या प्रवासा दरम्यान श्री अंबादास जी पिसाळ, श्री काकासाहेब तापकीर, अँड श्री शिवाजी अनभुले,श्री अशोक खेडकर, श्री सचिन पोटरे, डॉ सुनील गावडे, श्री दत्ता मुळे,श्री नंदलाल काळदाते, श्री काका धांडे, श्री गणेश पालवे, श्री अनिल गदादे, पंडाराजे बोरुडे,श्री बजरंग कदम, श्री नंदकुमार नवले, श्री तात्या खेडकर,श्री राहुल गांगर्डे, श्री संजय तापकीर, श्री शिवाजी वायसे, आदि कार्यकर्त्यांनी त्यांची भेट घेतली . या अनोख्या उपक्रमांचे कुतुहल गावकर्यां सोबत पक्षीय कार्यकर्त्यांना ही होते त्यामुळे या प्रवासात बहुसंख्य कार्यकर्त्यांनी भाग घेतला . उर्वरित बूथ वरील कार्यकर्त्यांचा प्रवास दि . ८ तारखेपासून सुरु झालेला आहे . सर्व प्रवासाचे अपडेट हे नमो अँप वर अपलोड करण्यात येत आहेत . या प्रवासा दरम्यान सर्व नोंदी प्रदेश कार्यालयाकडे पाठविण्यात येणार असे प्रतिपादन भाजप तालुकाध्यक्ष श्री शेखर खरमरे यांनी प्रसिद्धी पत्रकात केले आहे .