निर्मल सिड्स कंपनीच्या उडीद पिकामुळे शेतक-यांचे नुकसान शास्त्रज्ञ व उपविभागीय समितीचा निष्कर्ष

(प्रतिनिधी) : – कर्जत तालुक्यातील अनेक शेतक-यांनी निर्मल सिड्स कंपनीच्या उडीद पिकाला शेंगा लागल्या नसल्याने कृषी विभागाकडे अनेक शेतक-यांनी लेखी स्वरूपात व ज्या कृषी दुकानातून बियाणे खरेदी केले त्या दुकानदारांच्या पावती सह तक्रारी दाखल केल्या होत्या या तक्रारी ची दखल उपविभागीय कृषी अधिकारी राजेंद्र सुपेकर यांनी तातडीने दखल घेऊन वरिष्ठ अधिकारी व राहुरी विद्यापीठ चे तज्ञ शास्त्रज्ञ यांच्या शी लेखी पत्र व्यवहार करून शेतकऱ्यांच्या तक्रारी कळविल्याने राहुरी कृषी विद्यापीठाचे शास्त्रज्ञ यांनी उपविभागीय स्तरावरील समिती सह ज्या शेतकऱ्यांच्या उडीद पीकाला शेंगा लागल्या नाहीत त्या शेतकऱ्यांशी प्रत्यक्षात चर्चा करत निर्मल सिड्स कंपनीच्या उडीद पीकाची पाहाणी केली.
पाहाणी वेळी शेतक-यांनी निर्मल सिड्स कंपनीच्या उडीद पीकाला शेंगा लागल्या नाहीत व उडीद पीकावर मोठ्या प्रमाणात लव असल्याने आमचे नुकसान झाले आहे. यावेळी कृषी शास्त्रज्ञ व कृषी अधिकारी यांनी निर्मल सिड्स कंपनीच्या उडीद पीकाला शेंगा अत्य अल्प शेंगा लागल्या व मोठ्या प्रमाणात उडीद पीकावर तपकिरी रंगाचा लव असल्याचे मान्य करून शेतक-यांचे नुकसान झाले आहे हे कबूल केले.
राहुरी कृषी विद्यापीठाचे शास्त्रज्ञ व उपविभागीय कृषी समिती ची बैठक पंचायत समिती च्या मिटींग हाॅल मध्ये पार पडली यावेळी कडधान्य पैदास कार कृषी शास्त्रज्ञ डॉक्टर सुमेरसिंग राजपूत,राहुरी कृषी विद्यापी़ठाचे शास्त्रज्ञ डॉक्टर डी पी पाचरणे, उपविभागीय कृषी अधिकारी राजेंद्र सुपेकर, तालुका कृषी अधिकारी पद्मनाभ म्हस्के, पंचायत समिती चे कृषी अधिकारी रूपचंद जगताप, मंडल कृषी अधिकारी अनिल भापकर, निर्मल सिड्स कंपनीचे प्रतिनिधी व कृषी सेवा दुकानदार प्रतिनिधी दत्तात्रय भोसले यांच्या सह कृषी सहाय्यक व सुपरवायझर उपस्थित होते.
उपविभागीय समिती चा निष्कर्ष : शेतकऱ्यांचे नुकसान
तक्रार दार शेतकऱ्यांच्या शेतात भेटी दिल्या असता सदर क्षेत्रात उडीद पिकाच्या जातीस लागलेल्या शेंगा वरती लव दिसून आली तसेच दाण्यांचा रंग फिकट तपकिरी होता तसेच शेंगांमधील दाण्यांचा आकार लहान आहे आणि शेंगांचे प्रमाणही कमी आहे.
पर्यायाने शेतकऱ्याचे आर्थिक नुकसान झालेले आहे असा निष्कर्ष समितीतील सर्व सदस्यांनी काढलेला आहे