कर्जत शहरातील वीज वितरण केंद्रा मध्ये श्री दत्त जयंती उत्साहात साजरी

कर्जत (प्रतिनिधी) :- विद्युतरोषणाई, फुलांची आकर्षक सजावट आणि धार्मिक-सांस्कृतिक कार्यक्रमांनी काल शनिवारी (दि. 14 डिसेंबर) कर्जत शहरातील वीज वितरण केंद्र मिरजगाव रोड या ठिकाणी श्री दत्त जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. सायंकाळी मंदिरांमध्ये प्रथेप्रमाणे श्री दत्त जन्मसोहळा आयोजित केला या वेळी भाविकांची दर्शनासाठी मोठी गर्दी झाली होती.
दरवर्षीप्रमाणे यंदाही श्री दत्त जयंतीनिमित्त मंदिरांमध्ये वैविध्यपूर्ण कार्यक्रम आयोजित केले होते. अभिषेक, महापूजा, आरती, दत्तयाग यांसह भजन-कीर्तन, प्रवचन, व्याख्याने आदी कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडले. त्याचबरोबर श्री दत्तजन्म कार्यक्रम सायंकाळी सायंकाळी ६ वाजून १५ मिनिटांनी श्री दत्त जन्मसोहळा पार पडला. सायंकाळी आरती होऊन. श्री दत्त गुरूंच्या जयघोषाने मंदिर परिसर दुमदुमण गेले होते. यानिमित्ताने महाप्रसादाचे आयोजन महावितरणचे गव्हर्मेंट कॉन्ट्रॅक्टर विवेक मुळे व तुषार टाक यांच्यावतीने करण्यात आले होते. मोठ्या संख्येने भाविकांनी महा प्रसादाचा लाभ घेतला.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी वीज वितरण कंपनीच्या सर्व विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.