गोरक्षकाच्या नावाखाली बेकायदेशीर लूट व कारवाई थांबवा कुरेशी समाजाच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समिती कडे निवेदनद्वारे मागणी.

राशीन( प्रतिनिधी):- जावेद काझी .राशीन, कर्जत, जामखेड, दौंड ,श्रीगोंदा ,अहमदनगर, येथील कुरेशी समाज बांधवांच्या वतीने आज राशीन येथे ( गुरांच्या)जनावरांच्या आठवडे बाजारात होणाऱ्या खरेदी विक्रीवर बहिष्कार टाकून आपल्यावर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध एकत्रित येत राशींन व कर्जत कृषी उत्पन्न बाजार समितीला निवेदन दिले असून या निवेदनात म्हटले आहे की, आठवडे बाजारात जनावरे खरेदी विक्री कायदेशीर असताना बेकायदेशीर कारवाई करून कुरेशी समाजाला बदनाम करण्यात येत असून समाजाला जाणून बुजून वारंवार वेटीस भरले जात आहे. त्यामुळे राशीन येथील जनावरांच्या आठवडे बाजारावर कुरेशी समाजाच्या वतीने कुठल्याही प्रकारचे जनावरे न घेता बहिष्कार टाकला आहे . त्यामुळें कुरेशी समाजाला खोट्या केसेस ,लुटमार , गाड्या अडूऊन गोरक्षकाच्या नावाखाली होणारी पैशाची लूट, मानसिक त्रास, अशा अनेक समस्यांपासून,न्याय मिळण्यासाठी सर्व कुरेशी बांधव एकत्र येत कृषी उत्पन्न बाजार समिती राशीन. कृषी उत्पन्न बाजार समिती कर्जत, पोलीस निरीक्षक कर्जत यांना निवेदन दिले असून या निवेदनात म्हटले आहे.
की कुरेशी समाज हा कृषी उत्पन्न बाजार समितीचा लायसन धारक असून प्रत्येक खरेदी केलेल्या जनावराची कमिटी भरून रीतसर पावतीघेतली असताना देखील जाणून-बुजून कुरेशी समाजावर अन्याय होत असून तो त्वरित थांबवावा. यावेळी बोलताना कुरेशी समाजाचे जिल्हाध्यक्ष कार्तिक कुरेशी म्हणाले की, सुप्रीम कोर्टाने देशी गोवंश ची हत्या करून गोमांस विक्रीस बंदी घातली आहे. तरीही जर्सी जातीचे जनावरे पकडून कुरेशी समाजाला गोरक्षक व पोलीस यांच्याकडून वारंवार हाणामारी, दमदाटी, खंडणी मागणे असे प्रकार घडत आहेत. ही बाब प्रशासनाला ध्यानात आणून दिली आहे. त्या कृषी उत्पन्न बाजार समिती म्हणून तुम्हीच आम्हाला मदत करा अशी मागणी केली आहे. यावेळी आरपीआयचे जिल्हा उपाध्यक्ष रवींद्र दामोदर, शहाजीराजे भोसले, निलेश गायकवाड यांची भाषणे झाली. यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती काकासाहेब तापकीर म्हणाले, तुम्हाला मदत व सहकार्य करू तुम्हाला जाणून बुजून त्रास देणारे हिंदू गोरक्षक नाहीत तर गोरक्षकाच्या नावाखाली दुसरेच वेगळे प्रकार चालू आहेत.
शेतकरी जनावर विक्री करीत आहेत. आपल्या सर्वांच्या सहकार्याने शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढीसाठी पोषक वातावरण निर्माण करून कर्जत तालुक्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीमार्फत मोठ्या प्रमाणात त्यांच्या मालाला व जनावरांना संरक्षण व हितासाठी प्रयत्न करू असे आश्वासन दिले आहे. यावेळीकृषी उत्पन्न बाजार समिती सभापती काकासाहेब तापकीर,शहाजीराजे
राजे भोसले, माजी सरपंच रामकिसन साळवे,भारतीय जनता पार्टी अल्पसंख्यांक प्रदेश सचिव सोयब काझी, आर पी आय जिल्हा उपाध्यक्ष रवींद्र दामोदर, वंचित बहुजन माजी जिल्हाध्यक्ष निलेश गायकवाड, कुरेशी समाज जिल्हाध्यक्ष अतिक कुरेशी, कुरेशी समाज राशीन शहराध्यक्ष बबलू भाई कुरेशी, उस्मान कुरेशी, इस्माईल कुरेशी, इंनुस कुरेशी, असलम कुरेशी, समीर कुरेशी, मुनोवर कुरेशी, राजू भाई शेख, खदुस कुरेशी, हबीब कुरेशी, सोहेल कुरेशी, हसन कुरेशी, नाझीम कुरेशी, शरीफ कुरेशी, सलीम कुरेशी, रौफ कुरेशी, निसार कुरेशी, मुख्तार कुरेशी, अरबाज कुरेशी, मुजाहिद कुरेशी, इम्रान कुरेशी, शाहरुख कुरेशी, सद्दाम कुरेशी, जमील कुरेशी, कलीन कुरेशी, इरफान कुरेशी, रफिक कुरेशी, आमन कुरेशी व इतर कुरेशी समाज मोठ्या संख्येने उपस्थित होता.