राशीन मधील जिजाऊ महाविद्यालयास बी कॉम व बीएससी या अभ्यासक्रमाची मान्यता ; केशवराव शिंदे
राशीन प्रतिनिधी- जिजाई चॅरिटेबल ट्रस्ट संचलित राशीन तालुका कर्जत येथील जिजाऊ महाविद्यालयास नुकतीच महाराष्ट्र शासन मान्यताप्राप्त सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची बी.कॉम व बी.एस.सी या बारावी नंतरच्या उच्च शिक्षण अभ्यासक्रमाची मान्यता मिळाली असल्याची माहिती संस्थेचे संस्थापक अध्यक्ष केशवराव शिंदे यांनी दिली आहे.
अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील राशीन भागात उच्च शिक्षणाची सोय नसल्याने अनेक कुटुंबातील मुला मुलींना उच्च शिक्षण घेण्याची इच्छा असून देखील आपल्या गावात पुढील शिक्षणाची सोय नसल्याने पुढील शिक्षण पूर्ण करता येत नसे. त्यामुळे अनेक हुशार मुलं-मुली आपले अर्धवट शिक्षण सोडून शेतमजुरी करत असत याच बाबीची दखल घेत गेल्या अनेक वर्षापासून कर्जत तालुक्यात शिक्षण क्षेत्रात कार्य करत असलेले जिजाऊ चॅरिटेबल ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष केशवराव शिंदे यांच्या प्रयत्नाने राशीन व परिसरातील मुला मुलींना १२ वी पास झाल्या नंतर पुढील उच्च शिक्षण पूर्ण करण्यासाठी
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ मान्यता प्राप्त जिजाऊ महाविद्यालयाची मान्यता मिळाली असून या महाविद्यालयात बी.कॉम व बी.एस.सी या ग्रॅज्युएशन अभ्यासक्रमाची सुविधा उपलब्ध झाली आहे.
या विषयी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष केशवराव शिंदे यांनी अधिक माहिती देताना सांगितले की, राशीन परिसरातील सर्वच मुला मुलींना १२ वी परीक्षा उत्तीर्ण झाल्या नंतर उच्च प्रतीचे उच्च शिक्षण मिळावे या उद्देशाने संस्थेने खास आपल्यासाठी अत्यंत अल्प फी मध्ये उच्च प्रतीच्या उच्च शिक्षणाची सोय आपल्याच गावात शैक्षणिक वर्ष २०२४-२५ पासून उपलब्ध करून दिली असुन महाविद्यालयात तज्ञ प्राध्यापक वृंद, आवश्यक ते सर्व पुस्तकं, शैक्षणिक साहित्य, विज्ञान शाखेसाठी सुसज्ज अशी प्रयोगशाळा, भव्य क्रीडांगण, जिमखाना, गरीब-गरजू-गुणवंत होतकरु विद्यार्थ्यांसाठी कमवा
व शिका योजना आदीसह शासन नियमाप्रमाणे पात्र विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचा देखील लाभ मिळणार आहे तरी परिसरातील गरीब गरजू उच्च शिक्षण घेऊ पाहणाऱ्या इयत्ता १२ वी कॉमर्स व इयत्ता १२ सायन्स या शाखेतील उत्तीर्ण विद्यार्थ्यांनी आजच आपला प्रवेश निश्चित करून बी. कॉम व बी.एस.सी मधून उच्च शिक्षण पूर्ण करून घ्यावे असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष शिंदे यांनी केले आहे.