आमदार प्रा. राम शिंदे यांच्या विशेष प्रयत्नातून राशीन परिसरातील विविध रस्त्याच्या कामासाठी ६ कोटीचा निधी मंजूर.

राशीन ( प्रतिनिधी):- जावेद काझी.आमदार प्रा. राम शिंदे साहेब यांच्या विशेष प्रयत्नातून राशिन येथील वाॅर्ड क्र. ४ मधील सोनाळवाडी रस्ता ते सौताडे वस्ती,थोरात वस्ती ,जानभरे वस्ती,ढगेवस्ती या वाडी वस्तीवरील रस्त्याच्या कामासाठी महाराष्ट्र अर्थसंकल्प जुलै २०२४/२०२५ .
सार्वजनिक बांधकाम विभाग अंतर्गत ६ कोटी रुपयाचा निधी मंजूर झाला असून रस्त्याचे काम लवकरच सुरू होणार असून अत्यंत महत्वकांशी बऱ्याच वर्षापासून रखडलेला व खितपत पडलेला , दळणवळणाच्या दृष्टीने अत्यंत जिव्हाळ्याचा प्रश्न मार्गी लागत असल्यामुळे या परिसरातील लोकांनी समाधान व्यक्त करीत आमदार प्रा रामजी शिंदे साहेब यांचे आभार मानले आहे.
या कामाचा पाठपुरावा वेळोवेळी सातत्याने भाजपा अल्पसंख्याक मोर्चा प्रदेश सचिव सोयब काका काझी यांनी माजी मंत्री आमदार प्रा रामजी शिंदे साहेब यांच्या कडे केला होता अखेर आज या पाठपुराव्याला यश प्राप्त होताना दिसत आहे.