राशीन परिसरात मोकाट फिरणाऱ्या जनावरांचा बंदोबस्त करा ; राम कानगुडे.

राशीन( प्रतिनिधी )जावेद काझी :- राशीन परिसरात गाई म्हशी बैल वासरू व इतर जनावरांचा मोठ्या प्रमाणात वावर सध्या सुरू झाला असून या मोकाट फिरणाऱ्या जनावरांमुळे बारामती अमरापुर व दौंड उस्मानाबाद राज्यमार्गावर अपघात होण्याची संख्या वाढली असून शाळेत व कॉलेजमध्ये शिकत असणाऱ्या मुला मुलींना व ग्रामस्थांना तसेच रस्त्यावरून दुचाकी चार चाकी वाहनातून वाहतूक करणाऱ्या जीवितास धोका निर्माण झाला आहे.
तसेच सध्या राशीन व परिसरात पाऊस समाधानकारक पडल्यामुळे वेळीच पेरण्या झाल्या आहेत. यामुळे शेतकऱ्यांनी आप आपल्या शेतजमीनीत मका,उडीद,तुर, कांदा, ऊस व इतर पिकाची पेरणी व लागवड केली असल्यामुळे या मोकाट फिरणाऱ्या जनावरांमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान व नासधुस होत आहे.
संबंधित प्रशासनाने या मोकाट फिरणाऱ्या जनावरांच्या मालकांवर कारवाई करून मोकाट फिरस्ती जनावरे ताब्यात घ्यावी. अशी मागणी ग्रामपंचायत सदस्य राम कानगुडे व राशीन ग्रामस्थांकडून होत आहे.