सीईटी व नीट परीक्षेत दादा पाटील महाविद्यालय सर्वोच्च

कर्जत (प्रतिनिधी) :- दादा पाटील महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी बारावी सीईटी परीक्षेत उत्तम गुण मिळवून महाविद्यालयाचे सर्वोच्च स्थान अबाधित राखले आहे. दादा पाटील महाविद्यालयाने प्राचार्य डॉ. संजय नगरकर यांच्या मार्गदर्शनाखाली वर्षभर जादा तासिका, वेगवेगळ्या टेस्ट, तज्ञांची मार्गदर्शने, सराव सत्र, क्रॅश कोर्स अशा वेगवेगळ्या माध्यमातून कनिष्ठ विभागातील सायन्सच्या प्राध्यापकांनी विद्यार्थ्यांसाठी अथक परिश्रम घेतले.
सदर परीक्षेत प्रशांत राजेश सुथार या विद्यार्थ्याने ९९.९१ पर्सेंटाईल मिळवून सर्वोच्च स्थान पटकावले. बारावी सीईटी परीक्षेत महाविद्यालयातील एकूण २० विद्यार्थ्यांना ९० टक्क्यांपेक्षा पेक्षा जास्त पर्सेंटाईल मिळाले आहेत. त्यामधील दीप निलेश मोरे ९९.१३(पीसीबी) व ९७.८० (पीसीएम), सपना राजेंद्र धुमाळ ९८.४० (पीसीबी), विद्या भागवत गुंजाळ ९७.९४ (पीसीबी), स्वप्निल हरिश्चंद्र तांबे ९७.९१ (पीसीएम), रुद्रा दिनेश गाडे ९६.४६ (पीसीबी), वाडेकर निशा शरद ९६.०४ (पीसीबी), निखिल देविदास फरताडे ९५.३८ (पीसीएम), पूजा गणेश बरबडे ९५.१६ (पीसीबी), शिवाणी हनुमंत गव्हाणे ९३.७२ (पीसीबी), प्रचिती वाल्मीक भवर ९२.५८(पीसीबी), भूमिका अजय देवकुळे ९२.२६ (पीसीएम), आदित्य ज्ञानेश्वर महाराज ९१.७८ (पीसीएम), औटे वैष्णवी ९१.३२ (पीसीएम), विराज कैलास मुरकुटे ९०.८९ (पीसीएम), समृद्धी विक्रम कांबळे ९०.७६ (पीसीबी), संस्कृती वैजिनाथ काळे ९०.५२(पीसीएम), गणेश दादा अनारसे ९०.५१ (पीसीएम), नारायण बलभीम दंडे ९०.२७ (पीसीएम), उत्कर्षा संतोष लबडे ९०.१३ (पीसीबी) असे पर्सेंटाईल मिळाले आहेत.
केंद्रीय नीट परीक्षेत संकेत भरत सस्ते या विद्यार्थ्याने ६५० मार्क मिळवून एमबीबीएस ला आपला प्रवेश निश्चित केला आहे. याशिवाय शंतनू उद्धव मुरकुटे (५७२), रोहित दत्तात्रय गायकवाड (५५६), श्रावणी संजय माऊलकर (५४४), तनुजा भरत मेढे (४१५), प्रशांत राजेश सुथार (४४१) असे गुण मिळविले आहेत.
सीईटी व नीट परीक्षेतील सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे रयत शिक्षण संस्थेच्या जनरल बॉडीचे सदस्य व महाविद्यालय विकास समितीचे अध्यक्ष राजेंद्रतात्या फाळके, रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी बॉडीचे सदस्य व महाविद्यालय विकास समितीचे सदस्य आमदार रोहितदादा पवार, रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य व महाविद्यालय विकास समिती सदस्य अंबादासजी पिसाळ, महाविद्यालय विकास समितीचे सदस्य राजेंद्र निंबाळकर, बप्पाजी धांडे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय नगरकर, सायन्स विभाग प्रमुख प्रा. सुनील देशमुख, माजी विद्यार्थी संघटना तसेच कनिष्ठ व वरिष्ठ विभागातील सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर सेवक यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले