मिरजगाव परिसरात दरोडाच्या तयारी त असलेल्या सहा आरोपी स्कॉर्पिओ गाडी व ७,८०,०००/रुपये मुद्देमाल सह जेरबंद.

राशीन ( प्रतिनिधी) जावेद काझी. :- मिरजगाव येथे दिनांक २६.१२.२०२३ रोजी मिरजगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक यांना गोपनीय माहिती मिळाली की काही इसम स्कार्पिओ वाहनातून दरोडा टाकण्याच्या तयारीत असून ते क्रांती चौक मिरजगाव येथून आष्टी कडे जाणार आहे. माहिती मिळताच यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ दिवटे यांनी पोलीस नाईक गणेश ठोंबरे ,पोलीस कॉन्स्टेबल, गंगाधरआंग्रे, पोलीस कॉन्स्टेबल सुनील खैरे , पोलीस हेड कॉन्स्टेबल राहुल सपट, यांना सोबत घेऊन क्रांती चौक मिरजगाव येथे नाकाबंदी केली. त्यावेळी कोकण गावच्या दिशेने एक संशयित स्कार्पिओ येताना दिसताच त्यास
थांबण्यासाठी हात केला असता सदर गाडी नाकाबंदी तोडून कडा रोडणे सुसाट वेगाने गेली सदर गाडीचा पाठलाग केला असता तिखी गावच्या शिवारात स्पीड ब्रेकर वर स्कार्पिओ गाडी थांबवून पकडली असता सदर गाडीतील लोकांना नाव गाव विचारले असता, संतोष प्रभाकर खरात वय वर्ष 27 राहणार भटेवाडी ता. जामखेड, विशाल हरीश गायकवाड वय वर्ष 20 राहणार मिलिंद नगर जामखेड, आकाश रमेश गायकवाड वय वर्ष 29 राहणार गोरोबा टाकीज जामखेड, किरण अविनाश गायकवाड वय वर्ष 2३ राहणार मिलिंद नगर जामखेड, रवी शिवाजी खवळे वय वर्ष २२ मिलिंदनगर जामखेड, असे नावे असल्याचे सांगितले. गाडीची झडती घेतली असता या गाडीतून दरोडा टाकण्यासाठी लागणारे साहित्य लोखंडी सुरा, दोन लोखंडी गज, एक बांबूचे दांडके, मिरची पावडर, व वेगवेगळ्या कंपनीचे मोबाईल असा एकूण आयवज मिळून आला असून सदर बाबत मिरजगाव पोलीस स्टेशनला गुरन 397/2023, भा द वि क399,402 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर गुन्ह्याच्या तपासात आरोप यांच्याकडे सकल चौकशी केली असता, तसेच मंगल कार्यालयाचे सीसीटीव्ही तपासणी केली असता, मिरजगाव परिसरात मंगल कार्यालयाच्या सीसीटीव्ही फुटेज मध्ये वरील आरोपींचे फोटो मिळते जुळते दिसून आले. कसून अधिक चौकशी केली असता त्यांनी मिरजगाव पोलीस स्टेशन हद्दीतील आत्माराम गौरी लॉन्स मांदळी व शिवपार्वती मंगल कार्यालय थेरगाव येथे गुन्हे केल्याची कबुली दिली असून, ते गुन्हे खालील प्रमाणे आहेत.
गुरु नंबर ३९३/२०२३ भादवी३७९.,
गुरु नं ३६६/२०२३ भादवी ३७९.,
गुरु नं ३७५/२०२३ भादवी ३७९.
या सदर गुन्ह्याची कबुली दिली असून या सदर गुन्ह्यातील गेलेल्या माला पैकी ९ ग्रॅम वजनाचे सोने, व २४०००. रुपये रोख रक्कम तसेच स्कार्पिओ गाडी असा एकूण ७,८०,०००. रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सदरची कारवाई माननीय श्री राकेश ओला साहेब पोलीस अधीक्षक साहेब अहमदनगर, श्री प्रशांत खैरे साहेब अप्पर पोलीस अधीक्षक अहमदनगर, श्री विवेकानंद वाखारे उपविभागीय पोलीस अधिकारी कर्जत, यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ दिवटे, सहाय्यक फौ सुनील माळशिखरे,स.पो. एस एन भतानी, पोलीस हेड कॉन्स्टेबल बी .आय.गव्हाणे,पो.ना. गणेश ठोंबरे, पो.ना. विकास चंदन, पोलीस कॉ. गोकुळदास पळसे, पो.का, गंगाधर अग्रे,पो.का. राजेंद्र गाडे, पो.का. राहुल सपट या टीमने ही कारवाई केली आहे.