आयोध्या येथून आलेल्या अक्षदा कलशाचे राशिन मध्ये भव्य स्वागत.

राशीन (प्रतिनिधी) जावेद काझी. :- श्रीराम जन्मभूमी अयोध्या येथील श्रीराम मंदिराच्या मूर्ती प्रतिष्ठान सोहळ्याचा अक्षदा व मंगल कलशाचे स्वागत राशीन ग्रामस्थांकडून सोमवार दिनांक .१८.१२.२०२३ . रोजी सायंकाळी सहा वाजता ढोल ,
ताशा, डीजे च्या तालावर श्रीरामाची भक्ती गीते वाजवीत, फटाक्याची अतिशबाजी करत अक्षदा व मंगल कलशाचे स्वागत करण्यात आले. अक्षदा मंगल कलश भव्य मिरवणूक राशीन एसटी स्टँड पासून महात्मा ज्योतिबा फुले चौक, मुख्य बाजारपेठेतून ,छत्रपती शिवाजी महाराज चौक, मार्गस्थ होत श्री जगदंबा देवी मंदिर जवळ मिरवणुकीची समाप्ती झाली.यावेळी हरिचंद्र कोल्हे, दिलीप नष्टे , दत्ता आबा गोसावी , पांडुरंग भंडारे, शर्मा, पाटील , संकेत पाटील , अमोल शेटे, कल्याण जंजिरे, मोती महाराज सोनवणे, सागर कोल्हे, दीपक थोरात, आदीअसंख्य श्रीराम भक्त भगवी टोपी परिधान करीत अक्षदा मंगल कलश यात्रेत मोठ्या संख्येने उपस्थित होते.