तहसील कार्यालयावर निळा जन आक्रोश मोर्चासह शाहीरी जलसा.

कर्जत (प्रतिनिधी) : रमाई आवास योजनेअंतर्गत मजूर असलेल्या घरकुल लाभार्थ्यांना वंचित ठेण्याचे कारस्थान अधिकाऱ्यांकडून होत असल्याच्या निषेधार्थ व रमाई आवास योजनेची अमलबजावणी करण्यासाठी निळा जन आक्रोश मोर्चा व आमरण उपोषणाचा इशारा देण्यात आला आहे.
याबाबत कर्जतचे तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले असून निवेदनावर उपोषकर्ते दत्तात्रय कदम, भास्कर भैलुमे, संजय भैलुमे, रोहन कदम, सोमनाथ भैलुमे, विशाल काकडे, अजय भैलुमे, अनिल समुद्र, पै संतोष आखाडे, अमोल क्षिरसागर, पै विजय साळवे, सागर कदम, बाळासाहेब भैलुमे, करण ओहळ यांच्या सह्या आहेत.
निवेदनात म्हटले आहे की, कर्जत नगरपंचायत हद्दीतील रहिवाशी याचे रमाई आवास योजनेअंतर्गत घरकुल मंजुर आहेत परंतु अधिकारी वर्गाच्या नाकर्तेपणा मुळे सदर योजने पासुन मागासवर्गीय समाज वंचित ठेवण्याचे कारस्थान अधिकारी वर्ग जानुन बुजुन करत आहे, याच्या निषेधार्थ तात्काळ रमाई आवास योजनेची अमलबजावणी करणे बाबत 10
ऑक्टोबर रोजी डॉ बाबासाहेब आंबेडकर भवन सिध्दार्थ नगर येथून निळा जन आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच मोर्चा नंतर सर्व घरकुल धारकांसमवेत तहसील कार्यालयात आमरण उपोषण व शाहिरी जलसा या आंदोलनाची सुरुवात होणार आहे. रमाई आवास योजनेची तात्काळ अंमलबजावणी न झाल्यास तहसिल कार्यालयाच्या दुसन्या मजल्या वर घरकुल बांधकाम सुरु करण्याचा इशारा देखील देण्यात आला आहे.