सुजय विखे पाटील प्रचारार्थ शालिनी विखे पाटील यांची राशीनमध्ये महिला बैठक संपन्न.

राशीन ( प्रतिनिधी):- जावेद काझी. अहमदनगर दक्षिण (अहिल्यानगर) महायुती चे अधिकृत उमेदवार मा खा सुजय दादा विखे पाटील यांच्या प्रचारार्थ राशिन येथील वार्ड क्र ४ काझी गल्ली, कुंभार गल्लीमधील महिला ची बैठक आयोजित करण्यात आली होती त्या बैठकीस माजी जिल्हा परिषद अध्यक्षा सौ शालिनी ताई विखे पाटील यांनी
मार्गदर्शन करुन मा खासदार सुजय दादा विखे पाटील यांना भरघोस मतांनी निवडून द्यावे असे आवाहन करण्यात आले उपस्थित भाजपा तालुकाध्यक्ष शेखर भाऊ खरमरे महिला मोर्चा तालुकाध्यक्ष अॅड प्रतिभा रेणुकर जिल्हा सरचिटणीस सचिन भैय्या पोटरे भाजपा अल्पसंख्याक प्रदेश सचिव
सोयब काका काझी,साहील काझी,राशिन शहराध्यक्ष पै शिवाजी काळे अल्पसंख्याक शहराध्यक्ष जमीर भाई काझी राष्ट्रवादी काँग्रेस युवक अध्यक्ष सद्दाम काझी, डॉ विलास राऊत, गणेश पालवे,पप्पुशेठ दोधाड व कार्यक्रमास मुस्लिम समाजातील महिला ची उपस्थिती लक्षणीय होती कार्यक्रमाचे सर्व उपस्थिताचे आभार सोयब काका काझी यांनी मानले.