राशीनच्या डॉ. नम्रता खोसे सुवर्णपदकाने सन्मानित.

राशीन( प्रतिनिधी) जावेद काझी. :- पदोपदी येणाऱ्या अनेक शैक्षणिक समस्येवर मात करीत यशाचे उंच शिखर गाठण्यासाठी कठोर परिश्रम घेत राशीनच्या डॉक्टर नम्रता खोसे हिने भारतीय विद्यापीठातून एम. एस.
(स्त्रीरोगतज्ञ) तेची पदव्युत्तर पदवीत सुवर्णपदक पटकावणारी ती कर्जत तालुक्यातील पहिली मुलगी ठरली आहे, कर्जत राशीन सारख्या ग्रामीण भागातील विद्यार्थी देखील जिद्द चिकाटी आत्मविश्वासाच्या जोरावर यश प्राप्त करू शकतात हे उदाहरण डॉ. नम्रता खाेसे हिने ग्रामीण भागातील विद्यार्थ्यापुढे ठेवले आहे. डॉक्टर नम्रता ही सेवानिवृत्त प्राध्यापक भाऊसाहेब खोसे यांची मुलगी आहे. ती लहानपणापासूनच अभ्यासात हुशार असल्यामुळे अनेक शैक्षणिक वेगवेगळ्या परीक्षेत वेळोवेळी तिला चांगले यश मिळाले आहे. श्री जगदंबा विद्यालयातून ती दहावी परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर अकरावी बारावी शिक्षण तिने दादा पाटील महाविद्यालय कर्जत येथून पूर्ण करीत एम एस स्त्रीरोग तज्ञ पदवी भारतीय विद्यापीठ येथे पूर्ण केली. विद्यापीठाच्या 24 व्या पदवीदान समारंभात
आयआयएसईआरचे संचालक प्रो. कृष्णा एन गणेश, कुलपती डॉ. शिवाजीराव कदम, डॉक्टर विश्वजीत कदम, डॉक्टर विवेक सावजी, व इतर प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत डॉक्टर नम्रता खोसे हिला सुवर्णपदक बहाल करीत गौरवण्यात आले. तिच्या या गगनचुंबी यशामुळे कर्जत तालुक्यातील विविध स्तरातून अभिनंदनचा वर्षाव होत आहे.