डॉ. बाबासाहेब आंबेडकर व महात्मा ज्योतिराव फुले यांच्या संयुक्त जयंती निमित्त राशीन मध्ये रक्तदान शिबिराचे आयोजन.

राशीन( प्रतिनिधी):- जावेद काझी .डॉ बाबासाहेब आंबेडकर व महात्मा जोतीराव फुले यांच्या संयुक्त जयंती निमित्त राशीन , याठिकाणी
कमलेश भाऊ साळवे मित्र मंडळ व समस्त भीमसैनिक राशीन यांच्या वतीने दि : १२ एप्रिल रोजी भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरामध्ये 70 रक्तदात्यांनी रक्तदान केले.
कमलेश भाऊ साळवे मित्र परिवाराच्या वतीने दरवर्षी संयुक्त जयंतीनिमित्त समाजोपयोगी उपक्रम राबविले जातात. महापुरुषांच्या जयंत्या नाचुन साजऱ्या करण्यापेक्षा समाजोपयोगी उपक्रम राबवून साजरी करावी असे कमलेश भाऊ साळवे यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले.
कमलेश भाऊ साळवे यांच्या या स्तुत्य उपक्रमामुळे राशीन व पंचक्रोशीतून त्यांचे कौतुक होत आहे. या कार्यक्रमाला कर्जत जामखेड मधील विविध मान्यवरांनी भेट दिली. खास करून यावेळी वंचित बहुजन आघाडीचे नेते अरुण आबा जाधव यांनीही या कामाचे खूप कौतुक करून पुढील वाटचालीस शुभेच्छा देत, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व महात्मा ज्योतिबा फुले जयंती निमित्त भीमसैनिकांना व इतर ग्रामस्थांना शुभेच्छा दिल्या.