राशीन येथे क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांना अभिवादन.

राशीन(प्रतिनिधी) जावेद काझी कर्जत तालुक्यातील राशीन येथे क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.राशीन येथील महात्मा ज्योतिबा फुले चौकात प्रतिमा पूजन कार्यक्रम झाला,या वेळी तोफांची सलामी व फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. कार्यक्रमास सरपंच नीलम भीमराव साळवे, उपसरपंच शंकर देशमुख ,विजयकुमार मोढळे, विक्रम राजेभोसले,एकनाथ धोंडे,ग्रामपंचायत सदस्य शिवकुमार सायकर, दीपक थोरात, अॅड. युवराज राजेभोसले,
ॲड राऊत, सायकल वायरमन,भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हा उपाध्यक्ष डी.एस. कांबळे, जैन संघटनेचे समीर दोशी , संभाजी ब्रिगेडचे गणेश कदम, शहाजी राजेभोसले , सुनिल काळे , पवन जांभळकर , राजेंद्र राऊत ,माऊली सायकर, अॅड. हरिश्चंद्र राऊत, यांच्यासह महात्मा फुले फाउंडेशनचे सर्व सदस्य उपस्थित होते.यावेळी भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हा उपाध्यक्ष डी एस कांबळे यांनी महात्मा फुले यांच्यामुळेच बहुजनांना शिक्षण मिळाले व त्यामुळे बहुजनांचा उद्धार झाला असे सांगितले . कार्यक्रमाचे प्रास्ताविक महादेव सायकर यांनी केले. सूत्रसंचालन मालोजीराजे भिताडे यांनी केले. आभार महात्मा फुले फाउंडेशनचे अध्यक्ष कुंडलिक सायकर यांनी मानले.