खा. शरदचंद्र पवार व मा. बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते टाकळी खंडेश्वरी येथील दादा पाटील विद्यालय नामांतरण सोहळा

कर्जत (प्रतिनिधी) :- दादा पाटील विद्यालयाच्या नामांतरण व कर्मवीर जयंती सोहळ्यास तालुक्यातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे. असे अवाहन कर्जत तालुका काँग्रेसचे अध्यक्ष प्रा. किरण पाटील यांनी केले आहे.
टाकळी खंडेश्वरी ता कर्जत येथील विद्यालयास दलित मित्र दादा पाटील यांचे नाव देण्यात आले असून त्याचा नामांतरण सोहळा रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष खासदार शरदचंद्रजी पवार यांच्या हस्ते शनिवार दिनांक 28 नोव्हेंबर रोजी दुपारी एक वाजता टाकळी खंडेश्वरी येथे होणार आहे. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे मा. महसूल मंत्री, आमदार बाळासाहेब थोरात, खासदार निलेश लंके, रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन चंद्रकांत दळवी, आमदार रोहित पवार, भगीरथ शिंदे,
आमदार आशुतोष काळे, मॅनेजिंग कौन्सिलिंग सदस्य दादाभाऊ कळमकर, मीनाताई जगधने, राहुल दादा जगताप, राजेंद्र तात्या फाळके, नवनाथ बोडके, निळकंठराव पाटील, ज्ञानेश्वर खुरंगे हे मान्यवर उपस्थित राहणार आहेत. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या मार्गदर्शनानुसार नगर, बीड, पुणे भागात शिक्षण प्रसारणासाठी रयतच्या शाळा उघडण्यास गावकऱ्यांना प्रेरित करणारे व जिद्दीने कर्जत येथे.महाविद्यालय व टाकळी येथे विद्यालय उभारून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणाची दार खुली करणाऱ्या व दलित मित्र म्हणून नावलौकिक असणाऱ्या दादा पाटीलांचे कार्य सर्वश्रुत आहे. टाकळीतील त्यांच्या जन्मभूमीतील शाळेला दादा पाटलांचे नाव देण्यात येत असून या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे. असे किरण पाटील म्हणाले.