कर्जत तालुका शिवसेनेचा सुजय विखे पाटील यांना जाहीर पाठिंबा.

राशीन (प्रतिनिधी):-जावेदकाझी.लोकसभेच्या २०२४ च्या होणाऱ्या निवडणुकीत पुनश्य एकदा अहमदनगर दक्षिण मधून खासदारकीचे तिकीट सुजय दादा विखे पाटील यांना मिळाले असून शिवसेना शिंदे गट कर्जत तालुका यांच्यावतीने खा.सुजय दादा विखे पाटील यांना जाहीर पाठिंबा देत येणाऱ्या लोकसभा निवडणुक प्रचारात सक्रिय सहभाग असल्याचे शिवसेना एकनाथ शिंदे गट राशिन शहर प्रमुख दीपक जंजिरे व इतर पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे यांचा आदेश पाळीत शिवसेना जिल्हाप्रमुख बाबू शेठ टायरवाले, तालुकाप्रमुख बापूसाहेब नेटके, यांनी माननीय
सुजय दादा विखे पाटील यांना येणाऱ्या खासदारकीच्या निवडणुकीत प्रचंड बहुमताने निवडून आणण्यासाठी कंबर कसली असून संपूर्ण ताकदीने व विखे यांच्या पाठीशी उभे राहू अशी ग्वाही पत्राद्वारे दिली आहे. यासाठी सक्रिय सहभाग महिला आघाडी तालुकाप्रमुख सौ. कमल मासाळ, जिल्हा परिषद गटप्रमुख विकास काळे, तालुका उपमुख ऋषभ परदेशी, पंचायत समिती गणप्रमुख गणेश मोढळे, राशिन शहर उप प्रमुख सौरभ काळे, गणेश पवार, मंगेश वाघमारे, व इतर पदाधिकारी व कार्यकर्ते सुजय दादा विखे पाटील यांना येत्या निवडणुकीत दुसऱ्यांदा निवडून आणण्यासाठी मोलाचे सहकार्य करणार आहेत.