राशीन मुख्य बाजारपेठेतून जात असलेल्या दौंड- धाराशिव रस्त्याचे गटार बांधकाम १०मी.ऐवजी १६ मीटर अंतरावर करा: अल्लाउद्दीन काझी.

राशीन (प्रतिनिधी )जावेद काझी् :- राशिन गाव वीस हजार लोकसंख्येचेअसून येथील बाजारपेठ मोठी असल्याकारणाने दौंड धाराशिव रस्त्यावर वाहनांची व इतर नागरिकांची आवक जावक मोठ्या प्रमाणात असल्यामुळे जुनी गटार चेंबर बांधकाम 16 मीटर वर दोन्ही बाजूस मिळून झाले असून देखील सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे सदर पहिली गटार सोडून दुसरी गटार रस्त्याच्या अलीकडे १० मीटरवर बांधण्याचे प्रयत्न सध्या सुरू असल्यामुळे गावातील सर्व व्यापारी वर्ग नाराज असल्याचे दिसत आहे कारण व्यापारी व इतर नागरिकांच्या मते पहिल्या गटारीवर गटार बांधकाम केल्यास दौंड उस्मानाबाद (धाराशिव) राज्य मार्ग रस्ता १५ मीटर होईल व डीवाईडर मध्ये आले तर रस्त्याच्या दोन्ही बाजूस ७’५ मिटर प्रमाणे रस्ता होईल.व याबाबत काहीही अडचण येणार नाही. असे असताना देखील सार्वजनिक बांधकाम विभागाने दोन्ही रस्त्याच्या बाजूने ८-८ फुट मोकळी जागा सोडून रस्त्यावरच गटार बांधकाम केल्याचे सध्या तरी दिसत आहे. या विषयात स्थानिक आमदारानी त्यांना चुकीचे आदेश देऊन काम देऊन हे काम करण्यास सांगितले आहे. व तशी चर्चा देखील राशीन परिसरात आहे.तरी आपण राशीनच्या व्यापाऱ्यावरील होणारा अन्याय दूर करून राशींनच्या मुख्य बाजारपेठेतील गुदमरणारा श्वास मोकळा करून समस्त राशीन करांना रस्ता मोठा करून न्याय द्यावा नाहीतर मी सर्व ग्रामस्थ न्याय मिळण्यासाठी आंदोलन करण्याच्या भूमिकेत असल्याचे काझी यांनी म्हटले आहे . तसेच सदरचा सर्व विषय खासदार सुजय दादा विखे पाटील राशींनमध्ये आले असता सर्व व्यापारी वर्ग व ग्रामस्थांनी त्यांची भेट घेऊन या विषयी चर्चा झालेली आहे. त्यांनीही सहकार्य करण्याचे आश्वासन दिले आहे. संबंधित कॉन्ट्रॅक्टर कडून रस्ता १५ मीटर करून घेण्याबाबतचे भाजपा प्रदेश कार्यकारणी सदस्य अल्लाउद्दीन काझी यांनी महसूल मंत्री तथा/मा.ना .पालकमंत्री अहमदनगर जिल्हा यांना राशीन मुख्य बाजारपेठेतील रस्ता मोठा करण्याची निवेदनाद्वारे मागणी केली आहे.