राशीन मध्ये नाफेड अधिकृत भारत चणाडाळ विक्री केंद्रास नागरिकांचा उत्तुंग प्रतिसाद.

राशीन (प्रतिनिधी)जावेद काझी. :- भारत सरकारच्या ग्राहक व्यवहार विभाग व नाफेड अंतर्गत अधिकृत चना डाळ केंद्र श्री जगदंबा ट्रेडिंग कंपनी भिगवन चौक देवीच्या मंदिरा शेजारी राशीन येथे सुरू झाले असून वरील ठिकाणी साठ रुपये किलो प्रमाणे चणाडाळ विक्री केंद्र सुरू झाली असून दसरा, दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर राशिन व परिसरातील नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळत असून या केंद्रावर चना डाळ खरेदी करण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी बघावयास मिळत आहे.
आवश्यक कागदपत्र खालील प्रमाणे.
आधार कार्ड सोबत आणणे आवश्यक.
एका व्यक्तीस एक आधार कार्डवर पाच किलो चणाडाळ मिळेल.
येताना सोबत पिशवी घेऊन येणे.
अधिक माहितीसाठी रमेश सायकर
मो. नंबर(९०९६७८३५७०)व
(९६८९५७९३३७)
या नंबर वर संपर्क साधावा.
सदरची योजना तालुक्यातील वंचित राहिलेल्या सर्व गावामध्ये टप्प्याटप्प्याने सुरू होणार असून प्रत्येक गावातील नागरिकांनी या योजनेचा लाभ मोठ्या प्रमाणात घ्यावा. अशी माहिती श्री जगदंबा ट्रेडिंग अडत कंपनीचे मालक तसेच नाफेड अधिकृत भारत चना डाळ केंद्राचे चालक रमेश सायकर यांनी दिली. यावेळी रमेश सायकर प्रवीण शिरसकर इतर लाभार्थी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.