कर्जत येथील जोगेश्वरवाडी येथील भुखंडावर सामाजिक न्याय विभाग वसतीगृहाचे आरक्षण टाकण्यात यावे
नगरसेवक भास्कर भैलुमे यांचे सहा.समाज कल्याण आयुक्तांना निवेदन

समृध्द/कर्जत (प्रतिनिधी) :- नगर – कर्जत नगरपंचायत हद्दीतील जोगेश्वरवाडी येथील भुखंडावर सामाजिक न्याय विभागाच्यावतीने वसतीगृहाचे आरक्षण टाकण्यात यावे, या मागणीचे निवेदन सहा.समाज कल्याण आयुक्त राधाकिसन देवढे यांना देण्यात आले. याप्रसंगी नगरसेवक भास्कर भैलुमे, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष सुनिल शेलार, नगरसेवक प्रसाद ढोकरीकर, देवीदास खरात आदि उपस्थित होते.
निवेदनात म्हटले आहे की, कर्जत येथील मागासवर्गीय मुलांच्या शासकीय वसतीगृहासाठी कर्जत पंचायत हद्दीतील जोगेश्वरवाडी गट.नं.181, मधील प्लॉट नं.62 हा सामाजिक न्याय विभागाचे नावावर आहे. सदर प्लॉटवर सामाजिक न्याय विभागाचे वसतीगृहाचे आरक्षण टाकल्याशिवाय बांधकाम परवानगी मिळत नाही. या विषयावर आंबेडकरी चळवळीतील काम करणार्या कार्यकर्त्यांच्यावतीने वेळोवेळी तीव्र स्वरुपाचे आंदोलने करण्यात आलेली आहे.
केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री ना.रामदासजी आठवले, आ.रोहित पवार यांनी संचालक, नगररचना, महाराष्ट्र राज्य पुणे यांना लेखी पत्र व फोनद्वारे सूचना दिलेल्या आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून तालुक्यातून शिक्षणासाठी येणार्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांची गैरसोय होत आहे. सदर वसतीगृहाची इमारत होणे अत्यंत गरजेचे आहे. सदर जागा कर्जत शहराजवळ असून, गेली अनेक वर्षे निधी पडून आहे. कर्जत शहराची विकास योजना तयार करतांना जोगेश्वरवाडी येथील गट नं.181, प्लॉट नं.62 या जागेवर सामाजिक न्याय विभाग महाराष्ट्र शासन हे आरक्षण टाकण्यात यावे. अन्यथा कर्जत तालुक्यातील आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांच्यावतीने तीव्र स्वरुपाचे आंदोलन करण्यात येईल, असेही निवेदनात म्हटले आहे.
कर्जत नगरपंचायत हद्दीतील जोगेश्वरवाडी येथील भुखंडावर सामाजिक न्याय विभागाच्यावतीने वसतीगृहाचे आरक्षण टाकण्यात यावे, या मागणीचे निवेदन सहा.समाज कल्याण आयुक्त राधाकिसन देवढे यांना देण्यात आले. याप्रसंगी नगरसेवक भास्कर भैलुमे, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष सुनिल शेलार, नगरसेवक प्रसाद ढोकरीकर, देवीदास खरात आदि.