राशीन ग्रामपंचायतीच्या वतीने काझी गल्लीमध्ये जिल्हा परिषद शाळे समोर पेवर ब्लॉक व पाणी फिल्टर प्लांट बसविणे कामाचा शुभारंभ .

राशीन ( प्रतिनिधी):- जावेद काझी.
राशिन मधील वार्ड क्रमांक ४ मध्ये काझी गल्ली येथे जिल्हा परिषद प्राथमिक उर्दु शाळेच्या मोकळ्या राहिलेल्या प्रारंगनात पंधराव्या वित्त आयोगा अंतर्गत दोन लाख चे पेविंग ब्लॉक बसवणे तसेच चार लाखाचे पाणी फिल्टर प्लांट बसविणे उन्हाळ्याच्या व इतर दिवसात काझी गल्ली ,
कुंभारवाडा, माळवाडी, व इतर भागातील नागरिकांना थंडगार पाण्याचे (आरओ) फिल्टर शुद्ध पाणी पिण्यासाठी मिळावे या हेतूने आरो फिल्टर प्लांट बसवणे या दोन्ही कामाचा शुभारंभ राशीनच्या लोकाभिमुख सरपंच सौ. नीलम भीमराव साळवे यांच्या व इतर मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी ग्रामपंचायत सदस्य नाझीम भाई काझी, सदस्या सौ.अश्विनी शिवकुमार सायकर, युवक नेते भीमराव साळवे,इक्बाल भाई शेख, फिरोजभाई काझी ,अब्बासभाई काझी, पत्रकार जावेद काझी ,उर्दु शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती .मोमीन मेराज मेहबूब, श्रीमती नौशाद नबाब शेख, अबिदा राजू पठाण, शालेय मुले, मुली, व आदी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.