जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मलठण शाळेतील विद्यार्थिनी द्वितीय क्रमांक पटकावला

समृध्द कर्जत/(प्रतिनिधी) :- जिल्हा परिषद प्राथमिक शाळांच्या जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धा नेवासा फाटा येथे पार पडल्या. यात जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मलठण शाळेतील विद्यार्थिनी स्वरा नारायण वाघवले हिने 50 मीटर धावणे या शर्यतीत दुसरा क्रमांक पटकावला. यावेळी ग्रामस्थ व शाळेच्या वतीने तिची बैलगाडीतून मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीत हलगी वाद्याने ग्रामस्थांचे लक्ष वेधून घेतले. यावेळी तिचा शाळा व्यवस्थापन समिती व ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी कृषी उत्पन्न बाजार समिती माजी संचालक डॉ.श्री. सुरेश भिसे यांनी शुभेच्छा दिल्या व रोख 1000 रुपये पारितोषिक दिले. जिल्ह्यात प्रथम येणाऱ्या विद्यार्थ्यांना दरवर्षी 5000 रुपये बक्षीस दिले जाईल असे डॉ. सुरेश भिसे यांनी सांगितले. यावेळी शाळा व्यवस्थापन
समिती अध्यक्ष श्री. गुलाब भिसे, मा. सज्जन भाई पठाण, डॉ. इनामदार, विलास हळदे, श्री आटोळे सर यांनी प्रत्येकी 500 रुपये बक्षीस दिले. यावेळी सचिन दळवी भाऊ सावंत, योगेश खोसे आकाश हळदे, सुरेश हळदे, तुषार भिसे, राहुल कारंडे, सागर भिसे, बाळू गोरे, शिवाजी वाल्हेकर अंगणवाडी काकू, स्वराचे आजी आजोबा नातेवाईक उपस्थित होते. गावातील ग्रामस्थ, माता भगिनी, तरुण मंडळ मोठ्या संख्येने या मिरवणुकीत सहभागी झाले. शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती जाधव मॅडम, पदवीधर शिक्षक श्री. गोरे सर श्री.खांदवे सर, श्रीमती. अनभूले मॅडम, श्री. आटोळे सर यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले. तसेच स्वराचे कौतुक व अभिनंदन केले.