कर्जत शहरात मोठ्या भक्तीभावाने श्री संतशिरोमणी नरहरी महाराज पुण्यतिथी साजरी

समृध्द कर्जत / (प्रतिनिधी) : -सोनार समाजाचे औराध्य दैवत श्री संत शिरोमणी नरहरी महाराज यांची ७३८ वी पुण्यतिथी कर्जत येथील श्री संत गोदड महाराज सप्ताह कार्यक्रमात मोठ्या भक्ती भावाने साजरी करण्यात आली.
यावेळी सोनार समाजाबरोबरच इतर समाजातील लोक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. दरवर्षी प्रमाणे या वर्षीही श्री संत शिरोमणी नरहरी महाराज यांची पुण्यतिथी साजरी झाली.
कर्जत सराफ सुवर्णकार व सोनार समाजाच्या वतीने श्री संत गोदड महाराज यांच्या सप्ताह कार्यक्रम ठिकाणी श्री संत शिरोमणी नरहरी महाराज यांचे अभंग व भक्ती गीत गायन करून नरहरी महाराज यांची आरती करून पेढे वाटून पुण्यतिथी साजरी झाली. सुरवातीला श्री संत शिरोमणी नरहरी महाराज यांच्या प्रतिमेची पुजा प्रसिद्ध सराफ अक्षय माळवे व त्यांची पत्नी सपना माळवे यांच्या हस्ते करण्यात आली.
यावेळी सराफ सुवर्णकार संघटनेचे अध्यक्ष दीपक शहाणे, किशोर कुलथे,पत्रकार संघाचे अध्यक्ष सुभाष माळवे, संतोष कुलथे, अतुल कुलथे, अक्षय माळवे, शुभम कुलथे, जयश्री कुलथे, माधवी कुलथे,निर्मला मैड, उषा कुलथे, पल्लवी कुलथे, भाग्यश्री कुलथे, सुजाता शहाणे, वर्षा कुलथे, सपना माळवे, छाया शेलार, शोभा धांडे, वैशाली पंडित, अनिता शेलार, सुशिला मिसाळ, शिवानी शहाणे, शारदा हवालदार, गिता गदादे,
निलेश रत्नपारखी, दिनकर मिसाळ, अमोल कुलथे, मयूर शहाणे, ऋषीकेश टाक, अनिल कुलथे, कृष्णा कुलथे, योगेश पंडित, धनंजय महामुनी, सागर देवलालीकर, शरद शेलार सुरेश खिस्ती, दत्तात्रय शिंदे, संतोष देवकाते, हभप गोरखे महाराज, सागर सुर्वे, बप्पाजी धांडे यांच्या सह मोठ्या प्रमाणात लोक उपस्थित होते.