श्रीमंत हॉटेल ॲड लॉजिंगचे मोठ्या उत्साहात उदघाटन संपन्न

(समृध्द कर्जत) प्रतिनिधी – कर्जत तालुक्यातील चिंचोली काळदात चोफुल्याच्या वैभवात भर टाकणार्या भव्य अशा शाकाहारी व मांसाहारी हॉटेल श्रीमंत चे उद्घाटन श्री अण्णासाहेब कल्याणराव बांदल आणि गुरूवर्य सुदाम गोरखे (गुरुजी) यांच्या शुभ हस्ते रविवार दिनांक 4 रोजी सकाळी 11 वाजता करण्यात आले. या उदघाटन प्रसंगी जिल्हा सहकारी बँकेचे संचालक अंबादास पिसाळ, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती काकासाहेब तापकीर,
विक्रम राजे भोसले, मा. आ. मंगलदास बादल, शाम भाऊ कानगुडे, बंडाभाऊ मोडळे, आपेगावचे सरपंच पोपटराव औटे, ऊजनी सरपंच संतोष मेटे, बापू काळे, तानाजी झोळ सरपंच वाशिंबे, दादासाहेब बांदल, राहूल पवार, अशोक खेडकर, गुलाबकाका तनपुरे, तात्या बोरुडे, पंडाराजे बोरुडे यांच्या सह अनेक मान्यवर उपस्थित होते. हॉटेल श्रीमंत अतिशय भव्य अशा स्वरूपात सुरू करण्यात आले असून या हॉटेलमध्ये एसी ,नॉन एसी लॉजिंग ची सुविधा उपलब्ध आहे. जामखेड श्रीगोंदा हायवे रोडवर आणि निसर्गाच्या सानिध्यात असलेले हे हॉटेल नक्कीच लोकांना भुरळ घालत आहे. तसेच या हॉटेलमध्ये जेवणाचे दर सुद्धा माफक प्रमाणात आहेत. हॉटेल श्रीमंत म्हणजे चिंचोली गाव आणि चौफूल्याच्या वैभवात भरच म्हटले तर वावगे ठरणार नाही. असे हे भव्यदिवे हॉटेल बांदल परिवाराच्या वतीने सुरू करण्यात आले आहे. या हॉटेलचे संचालक धनुशेठ बांदल, उमेश बांदल, अमोल बांदल, चक्रधर बांदल, राधाकृष्ण बांदल आदी चोखंदळ खवय्यांना चवदार मेजवानी देण्यासाठी तत्पर आहेत.