
कर्जत (प्रतिनिधी) :-माणूस हा समाजप्रिय प्राणी आहे. व्यक्ती स्वतःसाठी नाहीतर समाजातील सर्व घटकांसाठी जीवन जगत असतो म्हणून समाजपयोगी काहीतरी करावे ही इच्छाशक्ती उराशी बाळगून राजकारण व समाजकारण करणारी व्यक्ती अशी स्वतःची ओळख निर्माण करणारे व्यक्तिमत्व म्हणजे आदरणीय श्री राजेंद्र फाळके उर्फ तात्या. शिक्षण ही एक पवित्र गंगा आहे. मानवी जीवन सुसंस्कारित करण्यासाठी शिक्षणाशिवाय पर्याय नाही त्यामुळे तात्यांचा समाजकारणात सर्वात जास्त आवडता विषय म्हणजे ‘शिक्षण’. कर्जत सारख्या दुष्काळी ग्रामीण आणि अडवळणी गावात मातृभाषेचे शिक्षण पोहोचलेलेहोते परंतु आधुनिक जगात ‘इंग्रजी’ माध्यमातील शिक्षणाला आलेले महत्त्व आणि त्यातून कर्जतचा विद्यार्थी वंचित राहिला तर तो आधुनिक जगाशी स्पर्धा कसा करील हा विचार तात्यांना स्वस्थ बसू देत नव्हता. त्यातून तात्यांच्या विचारावर देशाचे ज्येष्ठ नेते खासदार माननीय शरदचंद्रजी पवार साहेब व रयत शिक्षण संस्थेचे माजी चेअरमन कै.एन डी पाटीलसाहेब यांच्याविचारांचा मोठा प्रभाव होता.
ग्रामीण भागातील बहुजनांच्या मुलांना पाश्चात्य भाषेतून शिक्षण मिळाल्यास त्यांना पाश्चात देशाच्या सीमा खुल्या होऊन नवनिर्माण होण्यास गती मिळेल या विचारांची प्रेरणा घेऊन तात्यांनी सद्गुरु ग्रामविकास प्रतिष्ठानच्या माध्यमातून सन २००२ मध्ये डायनेमिक इंग्लिश स्कूल यानावानेपहिली इंग्रजी माध्यमाची शाळा कर्जत येथेसुरू केली. त्या परिस्थितीत विनाअनुदानित तत्वावर शाळा तीही इंग्रजी माध्यमाची हे अवघड पण अश्यक्य असणारे काम ग्रामीण, दुष्काळी आणि इंग्रजी माध्यमाच्या शाळेविषयी जागृती नसणाऱ्या कर्जत मध्ये सुरु केले.सुरुवातीच्या काळात कमी विद्यार्थी संख्या व छोट्याशा जागेत सुरू झालेल्या शाळेने आज एक भव्य व अग्रगण्य शैक्षणिक केंद्र म्हणून आपली ओळख निर्माण केलेली आहे. ज्यामध्ये नर्सरी ते दहावीपर्यंतचे वर्ग चालवले जातात, त्याचबरोबर ज्युनियर कॉलेजच्या विज्ञान विद्याशाखेचे शिक्षण दिले जाते. आज ही शाळा जवळपास १० एकर पेक्षा जास्त क्षेत्रात विविध व आधुनिक भौतिक सुविधांनी परिपूर्ण झाली आहे ज्यामध्ये सुसज्य संगणक प्रयोगशाळा, ग्रंथालय, डिजिटल वर्गखोल्या, विविध खेळ प्रकारांचे प्रशस्त क्रीडांगण ज्यामध्ये हॉलीबॉल,पासिंगबॉल, कबड्डी, खो-खो इत्यादी मैदानी खेळप्रकारांचे व बौध्दिकखेळांचे प्रशिक्षण विद्यार्थ्यांना दिले जाते. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी विशेष प्रयत्न विविध माध्यमातून केले जातात. त्यामुळे प्रत्यक वर्षी विधार्थी संख्येत वाढ होतच आहे आज ८०० पेक्षा जास्त विधार्थी डायनेमिक इंग्लिश स्कूलमध्ये आपले शिक्षण घेत आहेत.
रयत शिक्षण संस्थेच्या विविध पदावर काम करीत असतांना ग्रामीण भागातील सामान्यातील सामान्य विद्यार्थी महाविद्यालयीनयुवक आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होण्यासाठी त्याला पारंपारिक शिक्षणाबरोबर अद्यावत संगणकीय शिक्षण,कौशल्याधारित ज्ञान, उद्योजकता विकास, व्यावसायिक शिक्षण देण्यासाठी आपण केलेले प्रयत्न उद्याचा सक्षम भारताचा स्वावलंबी नागरिक होण्यासाठी उल्लेखनीय आहेत. आपण राजकारणात पंचायत समिती ते उपाध्यक्ष, जिल्हा परिषद अहमदनगर आणि अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अहमदनगर अशा विविध पदावर काम करीत असतांना आपण आपल्या कार्यकर्तुत्वाचा ठसा उमठवला आहे. हे सर्व काही करत असताना राजकारणातून समाजकारण आणि त्यातही शैक्षणिक गुणवत्ता वाढवण्यासाठी आपण करीत असलेले प्रयत्न यातून खऱ्या अर्थाने शाश्वत सामाजिक विकास साधला जाईल अशा कर्जतच्या भूमीत इंग्रजी शिक्षणाची बीजरोवणारे जननायक म्हणजे आदरणीय तात्या.
“महान स्वप्ने पाहणे आणि त्या स्वप्नांच्या दिशेने व दृष्टीने संपूर्ण चैतन्यानिशी कार्यमग्न राहण्यातच खरे धाडस असते.” हे आपण आपल्या कर्तृत्वातून दाखवून दिले आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !
श्री. राजेंद्र फाळके उर्फ तात्या
लेखन : डॉ. संतोष जबाजी लगड