प्रजासत्ताक दिनानिमित्त राशीनमध्ये विविध ठिकाणी ध्वजारोहण मोठ्या उत्साहात संपन्न.

राशीन (प्रतिनिधी)जावेद काझी :- 26 जानेवारी प्रजासत्ताक दिना निमित्ताने राशीन मध्ये विविध ठिकाणी मान्यवरांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यामध्ये राशीनच्या लोकाभिमुख सरपंच नीलम भीमराव साळवे यांच्या हस्ते जिल्हा परिषद उर्दू शाळा, जिल्हा परिषद मराठी मुलांची शाळा, ग्रामपंचायत कार्यालयासमोर ध्वजारोहण करण्यात आले.तर हाशु अडवाणी उच्च माध्यमिक व माध्यमिक विद्यालयाचे ध्वजारोहण समृद्ध कर्जत चे पत्रकार जावेद काझी यांच्या हस्ते करण्यात आले.तर श्री जगदंबा विद्यालयाचे ध्वजारोहण कार्यक्रम
माजी. सरपंच शाहूराजे भोसले यांच्या हस्ते करण्यात आला.तर कृषी उत्पन्न बाजार समितीचा ध्वजारोहण नूतन संचालक संग्राम पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी राशीन ग्रामपंचायत च्या वतीने मिल्ट्री ऑफिसर आसिफ काझी,व इतर सेवानिवृत्त अधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी भाजपाचे नेते अल्लाउद्दीन काझी, विक्रम देशमुख, राजेंद्र देशमुख, उपसरपंच शंकर देशमुख, शाहू राजे भोसले, शहाजीराजे,विक्रम राजे, साहिल काझी,सोयब काझी, भीमराव साळवे, रामकिसन साळवे, ग्रामपंचायत सदस्य युवराजसिंग राजेभोसले,अतुल साळवे, अमोल जाधव ,मालोजीराजे भिताडे, सुभाष जाधव, दादा लोंढे,दादा परदेशी, शरीफ काझी, जाकिर काझी, इतर ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.