आयोध्या येथे झालेल्या श्रीराम मूर्ती प्राण प्रतिष्ठाना निमित्त राशिन मध्ये ठीक ठिकाणी पुजा आरती करीत जल्लोषात प्रसादाचे वाटप.

राशीन (प्रतिनिधी) जावेद काझी. :- श्रीराम मंदिर अयोध्या येथे झालेल्या श्रीराम मूर्ती प्राणप्रतिष्ठेच्या निमित्ताने आज ऐतिहासिक दिवशी राशीन येथे भगवा झेंडा फडकवत व भगवी टोपी परिधान करीत श्रीरामाचा जयघोष करीत फटाक्याची अतिषबाजी करत गावातून मोटरसायकल रॅली काढण्यात आली त्यानंतर गणेश मंदिर जगदंबा हाउसिंग सोसायटी, छत्रपती शिवाजी महाराज चौक, श्रीराम मंदिर राशीन
येथे व इतर विविध ठिकाणी श्री रामाची पूजा आरती करत आमदार प्राध्यापक राम शिंदे यांच्या वतीने प्रसादाचे वाटप करण्यात आले. यावेळी भाजपाचे ज्येष्ठ नेते अल्लाउद्दीन काझी, शिवसेनेचे गणेश मोढळे, भाजपा अल्पसंख्यांक मोर्चा प्रदेश सचिव सोयब काझी, राशीन शहराध्यक्ष पै. शिवाजी काळे, परीट वाडीचे सरपंच विलास काळे, बंटी कदम, शंकर काळे, ओम काशीद, देव साळवे, अथर्व जंजिरे, संकेत काळे, पुजारी विक्रम रेणुकर, नायर अण्णा, व श्रीराम उत्सव समिती राशीन चे श्रीराम भक्त व इतर ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.