जिजाऊ जन्मोत्सव चे औचित्य साधून मराठा पतसंस्थेच्या कामकाजाला सुरुवात

कर्जत (प्रतिनिधी) :- अहमदनगर जिल्हा मराठा सेवा पतसंस्था मर्यादित अहमदनगर शाखा कर्जतच्या प्राथमिक कामकाजाची सुरुवात बाजारतळ युनियन बँक समोर,कर्जत येथे जिजाऊ जन्मोत्सव चे औचित्य साधून नुकतीच करण्यात आली.
जिजाऊ जन्मोत्सव 9 जानेवारी 2024 रोजी सकाळी ठीक साडेनऊ वाजता या पतसंस्थेच्या कामकाजाची सुरुवात करण्यात आली. याची सुरुवात मराठा सेवा संघ कर्जत तालुका अध्यक्ष तथा गट विकास अधिकारी कर्जत रुपचंद जगताप यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून व फीत कापून करण्यात आली.
पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष इंजी. विजयकुमार ठुबे, पतसंस्थेचे कर्जत तालुक्याचे संचालक कालिदास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली ही पतसंस्था सुरू करण्यात आली.
प्रथम शाखा व्यवस्थापक म्हणून संभाजी नांगरे काम पाहत आहेत.
त्या पतसंस्था उद्घाटन प्रकरणी प्रसंगी कर्जत तालुका मराठा सेवा संघ पदाधिकारी, सकल मराठा समाज मोठ्या संख्येने उपस्थित होता. यावेळी युवराज तनपुरे, संभाजी ब्रिगेडचे जिल्हा उपाध्यक्ष राहुल शेठ नवले, जिजाऊ ब्रिगेड च्या तालुका अध्यक्षा उज्वला शेळके यांनी आपले मनोगत व्यक्त केले. युवराज तनपुरे म्हणाले या संस्थेमध्ये ठेवीवर चांगला व्याजदर आहे, ग्राहकांनी आपल्या ठेवी येथे ठेवाव्यात. सायली मनोजकुमार होले ह्या चिमुकलीने राजमाता जिजाऊ बद्दल मनोगत व्यक्त केले. यावेळी अनेक व्यापारी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे आभार अमित देशमुख यांनी मानले.