कर्जत येथे भाजपासह इतर सर्व मित्र पक्षाच्या स्वतंत्र बैठका

कर्जत : महायुतीचे उमेदवार डॉ सुजय विखे यांच्या प्रचारार्थ पालकमंत्री राधाकृष्ण विखे व आ. प्रा. राम शिंदे यांनी कर्जत येथे भाजपासह इतर सर्व मित्र पक्षाच्या स्वतंत्र बैठका घेऊन कार्यकर्त्या बरोबर संवाद साधला.
कर्जत तालुक्यात पालकमंत्री राधाकृष्ण विखे व आ. प्रा. राम शिंदे यांनी दिवसभरात मिरजगाव सह कर्जत मध्ये विविध बैठका घेतल्या यामध्ये शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, आर पी आय, मनसे या राजकीय पक्षा बरोबरच कर्जत शहरातील व्यापारी वर्गा बरोबर बैठक घेतली तर बार असोशिसन मधील वकिला बरोबर संवाद साधला.
शिवसेनेच्या बैठकीत जिल्हाध्यक्ष बाबुशेठटायरवाले, महिला जिल्हाध्यक्षा डॉ शबनम इनामदार, तालुकाध्यक्ष बापुसाहेब नेटके, युवक तालुकाध्यक्ष सोमनाथ शिंदे, यांचे सह तालुक्यातील अनेक शिवसैनिक उपस्थित होते. यावेळी शिवसैनिकांनी मोकळे पणाने भावना व्यक्त केल्या, तर पालकमंत्री राधाकृष्ण विखे व आ. प्रा. राम शिंदे यांनी सर्वांबरोबर संवाद साधताना महायुतीचे उमेदवार डॉ सुजय विखे यांना विजयी करण्याचे आवाहन केले. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशाने सर्व शिवसैनिक विशेष मेहनत घेत विखे यांना विजयी करण्यासाठी मतदार संघ पिंजून काढतील असा शब्द यावेळी सेनेच्या वतीने देण्यात आला.