शिंदे सेनेच्या तालुकाप्रमुख बापूसाहेब नेटके यांच्या नेतृत्वाखाली राशिन मंडल अधिकारी, तलाठी कार्यालयातून होणाऱ्या विविध तक्रारी बाबत तहसीलदार व प्रांताधिकार्यांना निवेदन.

राशीन (प्रतिनिधी) जावेद काझी. :- राशिन मंडल अधिकारी, तलाठी, कार्यालय येथे शेतकरी व सर्वसामान्य नागरिकांची होत असलेली आर्थिक गळपेच बंद होणे बाबत प्रांत साहेब व तहसीलदार साहेब यांना विविध समस्या व मागण्यांबाबत शिंदे सेनेचे तालुका उपप्रमुख ऋषभ परदेशी यांच्या वतीने निवेदन देण्यात आले आहे. निवेदनात म्हटले आहे की राशीन मंडल अधिकारी, तलाठी, कार्यालय येथे शेतकरी व सर्वसामान्य नागरिकांची विविध कारणास्तव अधिकाऱ्यांकडून राजरोसपणे आर्थिक लूट होत असल्याचे वेळोवेळी निदर्शनास येत आहे, किरकोळ कागद व सही साठी अधिकाऱ्यांकडून पैशाची मागणी, कागदपत्र पूर्ण असताना नोंदणी तसेच संबंधित कामासाठी अडवणूक करणे, शेतकऱ्यांना व सर्वसामान्य नागरिकांना दुय्यम स्वरूपाची वागणूक देणे, वसीले बाजीवर कामे करणे. पंचनामे अहवाल वेळेवर न करणे वेळ काढू पणा करणे, याव्यतिरिक्त इतर अनेक प्रकारे नागरिकांची पिळवणूक संबंधित अधिकाऱ्यांकडून होत असून त्यांच्यावर कोणाचाच वचक राहिलेला दिसून येत नाही.
त्यामुळे आपणास दिलेल्या निवेदनाचा गांभीर्यपूर्वक विचार करून संबंधित अधिकाऱ्यांची सखोल चौकशी व्हावी.याबाबतचे निवेदन नायब तहसीलदार प्रकाश बुरुंगुळे यांना देण्यात आले आहे. यावेळी शिंदे सेना तालुका प्रमुख बापूसाहेब नेटके, युवा तालुका शहर प्रमुख सोमनाथ शिंदे, कर्जत तालुका उपप्रमुख ऋषभ परदेशी ,जिल्हा परिषद गटप्रमुख विकास काळे, राशीन शहर प्रमुख दीपक जंजिरे, आदी शिवसैनिक उपस्थित होते.