एकल महिलांच्या वाट्याला कायम अवहेलनाच : डॉ. नगरकर

कर्जत : पूर्वीचे ग्रामीण जीवन व आताचे सामाजिक जीवन यामध्ये बदल झाला असला तरी वास्तवात फारसा बदल झालेला नाही, एकल महिलांना आजही समाज सन्मान देत नाही,
एकल महिलांना समाजात आयुष जगताना अवहेलना सोसावी लागते. सावित्रीचे धाडस दाखवा. सामाजिक परिस्थितीमुळे अनेक कर्तुत्वान महिला झाकोळल्या गेल्या आहेत, अशा महिलांना मानसिक दृष्ट्या सबळ करण्याच्या उद्देशाने तेजस्विनी मंचाच्या माध्यमातून बळ
देण्याचा प्रयत्न केला जात आहे, असे मत महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय नगरकर यांनी व्यक्त केले. येथील दादा पाटील महाविद्यालयातील तेजस्विनी मंचच्या वतीने पूर्णागिनींचा सन्मान सोहळा व रथसप्तमीचे औचित्य साधून ६० एकल महिलांना सतीचे वाण व तिळगुळ देऊन सन्मान करण्यात आला, या वेळी
अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. प्रमुख पाहुणे सिंधुताई जमदाडे यांनी, एकल महिला आपल्या
कर्तुत्वाने पुढे येत आहेत, आपल्या शरीराकडे दुर्लक्ष करू नका, आपले अंतर्मन सजवा, असे मत व्यक्त केले. या वेळी लंका पठारे, जोशी मॅडम, सारिका परहर आदींनी मनोगते व्यक्त केली. कार्यक्रमास कर्जत परिसरातील एकल महिला तसेच महाविद्यालयातील महिला प्राध्यापिका उपस्थित होत्या. प्रास्ताविक तेजस्विनी मंचाच्या चेअरमन डॉ. माधुरी गुळवे यांनी केले. सूत्रसंचालन डॉ. भारती काळे यांनी केले. आभार डॉ. संगीता कुलकर्णी यांनी मानले.