गुढीपाडवा व डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त राशीन येथे रेशन दुकानावर आनंदाचा शिधा वाटप सुरू.

राशीन (प्रतिनिधी )जावेद काझी. :- राशीन येथे सरकार मान्य नंदादेवी महिला विकास मंडळ स्वस्त धान्य दुकानात पाडवा व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त अंत्योदय व प्राधान्य रेशन कार्ड लाभार्थ्यांना आनंदाचा शिधा वाटप शुभारंभ बुधवार दिनांक १२/४/२०२३ रोजी राशिन चे उपसरपंच शंकर देशमुख तसेच शिवसेनाप्रमुख/ ग्रामपंचायत सदस्य नाजीम काझी यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी स्वस्त धान्य दुकानदार संतोष नष्टे, आरिफ मुंडे, अंत्योदय व प्राधान्य लाभार्थी उपस्थित होते.
आनंदाचा शिधा ही योजना महाराष्ट्र सरकार यांच्यावतीने असून गुढीपाडवा व डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव गोर गरीब सर्वसामान्य जनतेला आनंदाने गोड साजरा करता यावा या उद्देशाने अंत्योदय व प्राधान्य रेशन कार्ड धारकांसाठी आहे यासाठी रेशन दुकानावर १०० रुपया मध्ये चनाडाळ १ किलो, रवा १ किलो, साखर १ किलो, खाद्यतेल १ किलो असा शिधा वस्तू संच स्वस्त धान्य दुकानावर या एप्रिल महिना अखेरपर्यंत मिळणार आहे. मशीनवर अंगठा लावताना आपल्या थैलीत चार पाकिटे असल्याची खात्री लाभार्थ्यांनी करावी. राशीन मधील सर्व स्वस्त दुकानात आनंदाचा शिरा उपलब्ध झाला असून फक्त अंत्योदय व प्राधान्य रेशन धारकांना हा लाभ मिळणार आहे.