राशीन पोलिसांच्या बेजबाबदार व निष्क्रियते पणामुळे चोरीचे सत्र सुरू.

राशीन (प्रतिनिधी)जावेदकाझी. :-मागीलआठवड्यापासून थंडीचे प्रमाण वाढल्यामुळे राशींनच्या बाजारपेठेत व गल्लीबोलात रात्रीच्या दहा नंतर सुखसुकाट पहावयास मिळत असल्यामुळे वाहन चोरीचे प्रमाण वाढलेले असून दरदिवशी चार चाकी व दुचाकी वाहने चोरीला गेल्याची चर्चा सध्या राशीन ग्रामस्थांमध्ये सुरू असून मागील काही दिवसापासून राशिन व इतर ठिकाणांवरून नागरिकांच्या घरासमोर लावलेली वाहने सुरक्षित नाहीत. घरासमोर ,सोसायटीच्या पार्किंग मध्ये दुकानासमोर सार्वजनिक पार्किंग मध्ये रस्त्याच्या बाजूस अशी एकही जागा शिल्लक नाही. जिथून वाहन चोरी होत नाही.
टू व्हीलर फोर व्हीलर गाड्यांचे लॉक तोडून अवघ्या काही मिनिटात वाहने चोरून नेली जात आहे. सराईत वाहन चोरट्यांचा वावर राशीन शहरात वाढतअसताना राशिन पोलीस स्टेशनची पोलीस यंत्रणा पेट्रोलियम न करता, रात्रीच्या गाड्या अडवून पैसे कमवण्यात मग्न असतात असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. रात्रीच्या वेळेस अचानक काही घटना घडल्यास एखादा व्यक्ती पोलीस स्टेशनच्या दिशेने गेला असता पोलीस स्टेशन रात्रीचे बंदच असते अशी अनेक नागरिकांची तक्रार देखील आहे.
राशीन शहरातून दररोज वाहने चोरीचा प्रकार गेल्या काही दिवसापासून सुरू आहे .परंतु चोरट्यापर्यंत अजूनही पोलीस यंत्रणा पोहोचू शकले नाही. यामुळे कर्जत पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्यामराव बळप यांनी दररोज होत असलेल्या या चोरी घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन राशिन पोलिसांच्या बेजबाबदार वागणुकीवर अंकुश लावावा. रात्रीची पेट्रोलियम व्यवस्था नियमित ठेवावी जेणेकरून वारंवार होणाऱ्या चोरी सत्रास आळा बसू शकेल.