दुरगाव येथिल प्रधान मंत्री ग्रामसडक योजनेतील रस्त्यावरिल खड्डे बुजवण्याची बसपाचे तालुकाध्यक्ष आल्ताफभाई शेख यांची मागणी.

राशीन ( प्रतिनिधी) :- जावेद काझी. :- मौजे दुरगांव तलाव ते थोटेवाडी ,मुसलमानवस्ती , भगत वस्ती हा रस्ता सुमारे गेली १० वर्षा पुर्वी प्रधानमंत्री ग्रामसडक योजने अंतर्गत झाला आहे. सदर रस्त्याला सध्या मोठ मोठे खड्डे पडलेले असून रस्त्यात खड्डे आहेत की खडयातुन रस्ता आहे हा प्रश्न परिसरातील सर्व नागरिकांना
पडत आहे. तसेच रस्त्याच्या बाजूला काटेरी झाडे आहेत. दुरगांव परिसरात विटभट्टी व्यवसाय चालु असून या परिसरात अनेक शेतकऱ्यांचे ऊसाच पिके आहेत. यामुळे या रस्त्याने विट आणि ऊस वाहतुक मोठया प्रमाणात होत असते तसेच सध्या दुष्काळी
परस्थिती मध्ये पिण्यासाठी आणि वापरण्यासाठी दुरगाव तलावाचे पाणी तालुक्यात इतरत्र या रस्त्याने टॅंकर व्दारे वाहतुक केली जाते. तसेच या परिसरातील विद्यार्थी , नागरिक , वृध्द , आजारी व्यक्ती , परिसरातील दुग्ध व्यवसाविक या सर्वांनाच याच
रस्त्याचा वापर करावा लागत आहे. मात्र सदरचा रस्ता हा अत्यंत खराब झाला आहे. यामुळे सदरचा रस्ता हा परिसरातील सर्व नागरिकांसाठी धोकादायक रस्ता झाला असून यामुळे सदर रस्त्यावर सतत अपघात होतात. रस्त्याच्या खराबी मुळे जिवीतास हानी होण्याची भयंकर भिती आहे याचे गांभीर्य लक्षात घेऊन सदर रस्त्याची
तात्काळ दुरुस्ती होणे अत्यंत आवश्यक आहे. यामुळे सदर निवेदनाव्दारे मे. साहेबांना विनंती की , वरील रस्त्याची तात्काळ
दुरुस्ती करण्यात यावी अन्यथा कर्जत तालुका बहुजन समाज पार्टी च्या वतीने पंचायत समिती कर्जत समोर दि. ०९/११/२०२३ रोजी तीव्र स्वरुपाचे आंदोलन करण्यात येईल याची सर्वस्वी जबाबदारी संबंधित प्रशासनाची राहील.