सिलिंग कायदा सुधारणेस मान्यता मिळाल्याबद्दल राशीनमध्ये पेढे वाटून स्वागत.

राशीन (प्रतिनिधी) जावेद काझी. :- सिलिंग कायदा सुधारण्यास मान्यता मिळाल्यामुळे राशीन येतील मुख्य बाजारपेठेत कृषी सेवा चालक निवृत्ती पाटील यांनी एडवोकेट निवृत्ती लोंढे, व विखे पाटील समन्वयक अमोल शेटे इतर ग्रामस्थांना पेढे भरवत सिलिंग कायदा सुधारणेचे स्वागत करण्यात आले आहे. सिलिंग कायदा सुधारणा करण्यास आज विधिमंडळाची मान्यता मिळाली आता खंड करी शेतकऱ्यांना भोगावट वर्ग 2 म्हणून वाटप केलेल्या जमिनीचा भोगावटा वर्ग १ करणे शक्य होईल. त्यांचा खंडकरी शेतकरी व सिलिंग जमीन मिळालेल्या भूमिहीन ,माजी सैनिक, दुर्बल घटकांना लाभ होईल. गावठाण हद्दीपासून पाच किलोमीटर अंतरावरील जमिनीचा सार्वजनिक प्रयोजनासाठी उपयोग करण्याचा मार्ग सुकर होईल.
अशी माहिती राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली. विधिमंडळाच्या नागपूर शेवाळी अधिवेशनात आज शेवटच्या दिवशी या विषयावर चर्चा झाली. त्यानंतर सिलिंग कायद्यातील सुधारणेला मान्यता देण्यात आली. सिलिंग कायद्याच्या केलेल्या सुधारणेमुळे खंडकरी शेतकऱ्यांना वाटप केलेल्या जमिनींना वर्ग १ चा मिळेल, त्याचप्रमाणे माजी सैनिक, भूमिहीन दुर्बल घटकांना वाटप केलेल्या सिलिंग जमिनी वर्ग १. करण्यास पात्र ठरतील. सार्वजनिक प्रयोजनासाठी ग्रामपंचायत करिता शेती महामंडळाची जमीन उपलब्ध करून देता येईल. पाणीपुरवठा, योजना, धनकचरा व्यवस्थापन प्रकल्प इत्यादी कामे मार्गी लागतील. अशी खंडकरी शेतकऱ्यांची अनेक वर्षापासून ची मागणी होती ती आता पूर्ण होताना दिसत आहे.
त्यासाठी सिलिंग कायदा सुधारणा करणे आवश्यक असल्याने विधी व न्याय विभाग ,वित्त विभाग, अशा प्रशासकीय विभागाची मान्यता घेण्यात आली आहे, मंत्रिमंडळ मान्यतेनंतर हा प्रस्ताव विधिमंडळासमोर मांडण्यात आला. १५ डिसेंबर रोजी विधानसभेची व २० डिसेंबर रोजी विधान परिषदेची मान्यता मिळाली. त्यामुळे कायद्यातील सुधारणा मंजूर झाली. या ऐतिहासिक निर्णयामुळे राशीन ग्रामस्थांकडून व खंडकरी शेतकऱ्यांकडून राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील व खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्यावर अभिनंदन चा वर्षाव होत आहे.