राशीन ग्रामपंचायत च्या वतीने 17 लाखाच्या विविध कामाचा शुभारंभ.

राशीन ( प्रतिनिधी )जावेद काझी. :- राशीन ग्रामपंचायत च्या वतीने राजेंद्र भैय्या देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली १७ लाखांच्या विविध कामांचा शुभारंभ राशीनच्या लोकाभिमुख सरपंच सौ नीलम भीमराव साळवे यांच्या हस्ते करण्यात आला.
यामध्ये दलित वस्ती सुधार योजनेअंतर्गत वार्ड क्रमांक पाच मध्ये ७ लाखाचे पेविंग ब्लॉक बसवणे ,१५ व्या वित्त आयोगा अंतर्गत भिमाई नगर येथेब्लॉक,७ लाख ७५ हजाराचे पेविंग ब्लॉक बसवणे, तसेच लक्ष्मी आई इंदिरासमोर पंधराव्या वित्त आयोग अंतर्गत पेविंग ब्लॉक बसवण्यासाठी ३ लाख निधी उपलब्ध झालो
असून एकूण १७ लाखाच्या विविध कामाचा शुभारंभ करण्यात आला यावेळी ग्रामपंचायत सदस्य अतुल साळवे, दयानंद आढाव, दीपक थोरात, मजीद बाबा कुरेशी, खाजाभाई कुरेशी, अफजल कुरेशी, सोहेल कुरेशी, शरीफ कुरेशी, लड्डू कुरेशी, आयुब कुरेशी, हनीफ सय्यद, स्वालेहीन शेख ,डॉक्टर मरीबा आढाव, भारत साळवे, लक्ष्मीबाई साळवे, रतन बाई साळवे, कोमल साळवे, कौसाबाई साळवे, छाया साळवे, राणी साळवे, मनीषा साळवे,आदी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.