राशीन मध्ये आनंद सुपर डीलक्स मिनी थिएटर चे उद्घाटन.

राशीन (प्रतिनिधी )जावेद काझी. :- राशीन येथे राशीन सिद्धटेक रोडवर जगदंबा देवी मंदिर आवारात आनंद सुपर मिनी डीलक्स थिएटरचे उद्घाटन मंगळवार दिनांक १२ डिसेंबर रोजी सायंकाळी सहा वाजता उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी राहुल राजे भोसले, तात्यासाहेब माने, मनोज बोरा, दादासाहेब जाधव, सुनील त्रंबके, निरज कांबळे, शिरीष रेणुकर, एडवोकेट बाळासाहेब रगडे, राजेंद्र नस्टे, वीरभद्र पखाले, लोखंडे सर, इतर ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आई जगदंबेच्या पावन राशिन नगरीत पूर्वीच्या जुन्या आठवणींना उजाळा देत खास मनोरंजनासाठी ग्रामीण भागातील नागरिकांना चित्रपट पाहण्यासाठी पुणे ,बारामती ,नगर, शहरी भागात न जाता राशीन शहरात खास महिलांसाठी,व फॅमिली सोई साठी आनंद टुरिंग टॉकीज मध्ये सर्व जुने नवे हिंदी मराठी चित्रपट पाहण्यासाठी खुर्ची बैठक व्यवस्थेची खास सोय करण्यात आली आहे,
तसेच राशीन मध्ये चित्रित झालेल्या आई जगदंबेचे महत्व सांगणारे मराठी कौटुंबिक चित्रपट फॅमिली नंबर १ राशीन नगरीत रोज दुपारी १२,३,६,९ दररोज ४ शो होणार असून, तिकीट दर ७० रुपये आहे. फॅमिली नंबर वन १, बाई पण भारी देवा, झिम्मा, गदर, जवान, व इतर नामांकित कौटुंबिक चित्रपट पहावयास मिळणार आहे तरी राशीन व परिसरातील नागरिकांनी खास करून महिलांनी फॅमिली नंबर १ व इतर चित्रपट पाण्याची संधी डवलु नये हे मिनी थिएटर फक्त १५ दिवसासाठी राशीन मुक्कामी राहणार असून, जास्तीत जास्त नागरिकांनी या चित्रपटगृहात चित्रपट पाहण्याचा आनंद घ्यावा अशी आयोजकाकडुन विनंती करण्यात येत आहे.